CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 06:10 AM2020-05-21T06:10:07+5:302020-05-21T06:10:40+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते.

CoronaVirus News: 40% corona cure in the country; Mortality rate is 0.2 per cent per lakh | CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

CoronaVirus News : देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४०%; मृत्युदर लाखामागे ०.२ टक्के

Next

- टेकचंद सोनवणे

नवी दिल्ली : सलग चौथ्या लॉकडाऊनचा अत्यंत चांगला परिणाम दिसत असून, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता जवळपास ४० टक्क्यांवर पोहोचल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधीत आरोग्य यंत्रणांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

भारतात लाखापेक्षाही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली होती. आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष म्हणजे पहिल्या लॉकडाऊनमध्ये कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अवघे ७.१ टक्के होते. चौथ्या लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण तब्बल पाचपट करण्यात भारताला यश आले. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये ११.४२ टक्क्यांवरून तिसºया टप्प्यात दुपटीपेक्षा जास्त २६.५९ टक्क्यांवर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले होते.

जगातील १५ देशांची एकत्रित लोकसंख्या भारताइतकी असून, तिथे ३६ लाख ४५ हजार रुग्ण आहेत. जागतिक महासत्ता असलेली अमेरिका यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. भारताने मात्र वेळीच उपाययोजना करून कोरोना प्रसार मर्यादित करण्यात यश मिळवले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण असे वाढवले
लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवहारावर निर्बंध आणताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांची पूर्तता देशात करण्यात आली. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी तीन श्रेणीत रुग्णालयांची विभागणी करण्यात आली. रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसत असताना रुग्णांना होम क्वारंटाईन, दहा दिवसांनी घरी जाण्याची मुभाही दिली. जीवनशैलीतील बदलांमुळेही प्रतिकारशक्ती वाढली. उपचार सुरू असलेल्या ६१ हजार १४९ पैकी २.९४ टक्के रुग्णांना आॅक्सिजनपुरवठा केला जात आहे, तर ३ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून, ६.४५ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपताना हे प्रमाण सरासरी ७० टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत २५ लाख ३६ हजार १५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. बुधवारी दुपारपर्यंत १ लाख ७ हजार ६०४ नमुने तपासण्यात आले आहेत, अशी माहिती आयसीएमआरचे वरिष्ठ संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.

रुग्णसंख्येत दहा देशांच्या यादीत असूनही भारतात मृत्यूदर सर्वांत कमी आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक २७.७ टक्के रुग्णांचा मृत्यू आतापर्यंत झाला. एक लाखामागे तेथे ५९ जणांचा मृत्यू झाला. भारतात हे प्रमाण एक लाख रुग्णांमागे ०.२ टक्का आहे. लोकसंख्येच्या बाबतीत तुल्यबळ असलेल्या चीनच्या दाव्यानुसार हे प्रमाण ०.३ टक्का आहे. अमेरिकेत दर लाखामागे ४५२, तर स्पेनमध्ये ४९६ जणांना कोरोना होतो. इटलीमध्ये ३७४, ब्रिटनमध्ये ३७१, जर्मनीमध्ये २११, फ्रान्समध्ये २१०, रशियात २०८, तुर्कीमध्ये १८३, इराणमध्ये १५०, ब्राझीलमध्ये ११५ संक्रमित आहेत. जगात हीच सरासरी ६२ आहे, तर भारतात एक लाख लोकांमागे ७.९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

0.3% आयसीयूत
देशात सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या

61149 सध्या बाधित

6147 रुग्ण

10%हा आकडा आहे.
43070
ठणठणीत बरे

Web Title: CoronaVirus News: 40% corona cure in the country; Mortality rate is 0.2 per cent per lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.