शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 12:20 IST

CoronaVirus Updates and News : देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्देदेशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे.

हरिद्वार: हरिद्वारमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचा (कोविड -१९) विस्फोट होण्याची शक्यता आहे, कारण येथील एका मल्टीनॅशनल कंपनीतील २८८ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे कर्मचारी वेगवेगळ्या भागात राहत होते. तसेच, ते सामान्य लोकांच्या संपर्कात आल्याचेही सांगितले जात आहे. प्रशासन आता या मल्टीनॅशनल कंपनीतील कर्मचाऱ्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री तपासून पाहत आहे. याशिवाय. याच कंपनीतील इतर ४०० कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. 

मीडियाच्या रिपोर्टनुसार, कोरोना विषाणूच्या संसर्गाची स्थिती पाहता कंपनीच्या आजू-बाजूचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. माध्यमांना माहिती देताना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, "कंपनीतील २88 कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. इतर ४०० कर्मचाऱ्यांचा अहवाल येणे बाकी आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना संसर्ग झाल्यानंतर, त्यांची कॉन्टेक्ट हिस्ट्री आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी १६४ लोकांची टीम कामाला लागली आहे."

डॉक्टरांची सर्वात मोठी संस्था इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) देशातील वाढत्या कोरोनाच्या या समस्येबद्दल इशारा दिला आहे. आयएमएने म्हटले आहे की, 'देशात हा समूह संसर्ग पसरला आहे. देशातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.' विशेष म्हणजे, कोरोनाने जगाला विळखा घातला आहे. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर सहा लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगभरात अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक कोरोना प्रकरणांत भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे. 

देशात कोरोनाचा धोका वाढला असून गेल्या २४ तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. तसेच चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून अकरा लाखांचा टप्पा पार केला आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (२० जुलै) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ४०, ४२५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ६८१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ लाख १८ हजार ४३ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा २७,४९७ वर पोहोचला आहे.

आणखी बातम्या...

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत पालिकेच्या विशेष पथकाची कारवाई, ५ टेम्पो जप्त    

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या