शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

Coronavirus News पूर्णत: भारतात तयार झालेले १३४० व्हेंटिलेटर्स राज्यांना सुपूर्द

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 8:59 AM

पीएम केअर फंडात ३१०० कोटी रुपयांचा निधी; त्यातील २००० कोटी व्हेंटिलेटरवर खर्च होणार

नवी दिल्ली : संपूर्णपणे भारतात तयार झालेल्या १३४० व्हेंटिलेटर्सचे विविध राज्यांना वाटत करण्यात आले असून, त्यापैकी २७५ एकट्या महाराष्ट्राला मिळाले आहेत. पीएम केअर्स फंडातून ५० हजार व्हेंटिलेटर्स तयार करण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे.कोरोनाच्या अनेक रुग्णांना प्रसंगी व्हेंटिलेटर्सवर ठेवावे लागते. त्यामुळे त्यांची कमतरता भासू नये, यासाठी भारतातच व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी ३१०० कोटी रुपयांचा पीएम केअर फंड असून, त्यापैकी दोन हजार कोटी रुपयांतून हे व्हेंटिलेटर्स देशात तयार करण्यात येत आहेत. आतापर्यंत भारतात २९२३ व्हेंटिलेटर्स तयार करण्यात आले आहेत आणि त्यापैकी १३४० चे वाटप विविध राज्यांना केले आहे.महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीलाही २७५ व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत आणि गुजरात (१७५), बिहार (१००), कर्नाटक (९०) व राजस्थान (७५) असे व्हेंटिलेटर्स दिली. जे ५० हजार व्हेंटिलेटर्स बनवण्यात येणार आहेत, त्यातील ३० हजार भारत इलेक्ट्रॉनिक तयार करणार आहे. अ‍ॅग्वा हेल्थकेअरकडून १० हजार व्हेंटिलेटर्स तयार करून घेतले जातील. याखेरीज एएमटीझेड बेसिक) ४५५०, एएमटीझेड एंड ४००० तर अलाइड मेडिकल ही कंपनी ३५० व्हेंटिलेटर्स तयार करणार आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी पीएम केअर फंड निर्माण करण्यात आला असून, त्यातून परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. राज्याची लोकसंख्या, तेथील कोरोनाची स्थिती याआधारे या फंडमधून रक्कम दिली जाते. आतापर्यंत महाराष्ट्राला १८१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशला १०३ कोटी, तमिळनाडूला ८३ कोटी, गुजरातला ६६ कोटी, दिल्लीला ५५ कोटी, पश्चिम बंगालला ५३ कोटी, बिहारला ५१ कोटी, मध्य प्रदेशला ५० कोटी, राजस्थानला ५० कोटी, कर्नाटकला ३४ कोटी रुपये दिले आहेत. 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी पीएम केअर्सची (पीएम सिटिझन असिस्टन्स अँड रीलिफ इन इमर्जन्सी सिच्युएशन्स फंड) स्थापना केली. २७ मार्चला पीएम केअर्सची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान मोदी पीएम केअर्सचे प्रमुख आहेत. याशिवाय या ट्रस्टमध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा समावेश आहे. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी देशवासीयांनी पीएम केअर्समध्ये दान करावं, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्याला देशाच्या जनतेनं प्रतिसादही दिला. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी कोरोनाचे १४ हजार रुग्ण आढळून येत आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा साडे चार लाखांच्या पुढे गेला आहे. यातील सव्वा लाखांहून अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत अतिशय झपाट्यानं वाढली आहे. दिल्लीत कोरोनाचे ६६ हजार रुग्ण आहेत. त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांक लागतो. तमिळनाडूतील कोरोना बाधितांचा आकडा ६४ हजार इतका आहे. यानंतर गुजरात (२८ हजार), उत्तर प्रदेश (१८ हजार), राजस्थान (१५ हजार), पश्चिम बंगाल (१४ हजार), मध्य प्रदेश (१२ हजार), हरयाणा (११ हजार) ही राज्यं येतात.(फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीPositive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्या