शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मुंबई आयआयटीत नवे सत्र ऑनलाइन पद्धतीने होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:16 IST

नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येईल. या निर्णयाचे देशातील इतर आयआयटी अनुकरण करण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोना संसर्गाने माजविलेला हाहाकार लक्षात घेता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबईने येत्या डिसेंबरपर्यंत प्रत्यक्ष वर्ग न घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येईल. या निर्णयाचे देशातील इतर आयआयटी अनुकरण करण्याची शक्यता आहे.विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्याच आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन आयआयटी मुंबईने हे पाऊल उचलले आहे. शैक्षणिक सत्राला सुरुवात होऊनही कॅम्पसमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष हजर नाहीत, असा प्रसंगही आयआयटीच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. नवे शैक्षणिक सत्र जुलैच्या प्रारंभी सुरू होऊन डिसेंबर अखेरीस संपेल. आयआयटी मुंबईचे संचालक शुभाशिष चौधरी यांनी सांगितले की, नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांना आॅनलाइनद्वारे शिकवावे हा निर्णय सिनेटमधील सविस्तर चर्चेनंतर घेण्यात आला.विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या पद्धतीबद्दल कोरोनाच्या साथीमुळे पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास आणखी विलंब होऊ नये म्हणून आॅनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारण्यात आला. आॅनलाइन वर्ग कधी भरणार, याचा तपशील विद्यार्थ्यांना लवकरच कळविण्यात येईल. आयआयटीमध्ये शिकायला येणाऱ्या मुलांपैकी अनेक मुले दुर्बल घटकांतून आलेली असतात. आॅनलाइन शिक्षणासाठी लागणाºया साधनांसाठी या विद्यार्थ्यांना समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांनी मदत केली पाहिजे. देशात कोरोना संसर्गाच्या फैलावामुळे नवे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू करावे, याबद्दल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.