शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown: 'असा' असणार चौथा लॉकडाऊन; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 19:45 IST

देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू; ३१ मेपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. याबद्दलचं केंद्र सरकारचं पत्रक समोर आलेलं आहे. यानंतर आता चौथ्या लॉकडाऊनमधील नियमावलीची माहिती पुढे आलेली आहे. चौथ्या लॉकडाऊनचे नियम नवे असतील, असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात राज्यांना जास्तीचे अधिकार देण्यात येतील, असे सूतोवाचदेखील पंतप्रधानांनी केले होते. केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रापाठोपाठ तमिळनाडू, पंजाब, तेलंगणानंदेखील लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागानं देशातला लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवत असल्याचं जाहीर केलं. तिसऱ्या टप्प्याच्या तुलनेत चौथ्या टप्प्यात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाणार आहे.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, लोकल, विमानसेवा बंदच राहील. पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली होती. मात्र विमानतळं मुख्य शहरांमध्ये येतात आणि त्या भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त असल्यानं विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. मजुरांना घरी सोडण्यासाठी सुरू असलेल्या श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरूच राहतील.शाळा, महाविद्यालयं, चित्रपटगृह, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट्स लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातदेखील बंद राहणार आहेत. क्रीडा संकुलं आणि स्टेडियम उघडण्यात येतील. मात्र तिथे प्रेक्षकांना परवानगी नसेल. धार्मिक स्थळं बंदच राहतील. धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनांनादेखील परवानगी नसेल. राजकीय कार्यक्रमांचं आयोजनही करता येणार नाही.लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी काही नवे नियम करण्यात आले आहेत. यामध्ये राज्य सरकारांना काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन वगळता दोन राज्यं एकमेकांच्या सहमतीनं बसेस सुरू करू शकतात. रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन निश्चित करण्याचे अधिकारदेखील राज्यांना देण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयं सुरू राहणार असून त्या कार्यालयांमधलं कँटिनही सुरू असेल. याशिवाय संध्याकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू राहील.देशातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढले, केंद्र सरकारकडून घोषणाVIDEO: सोनियांचं नाव घेत अर्थमंत्र्यांनी थेट हातच जोडले; पाहा नेमके काय घडले कोरोनाचा असाही परिणाम; तब्बल २६ कोटी भारतीयांची चिंता वाढणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी