शहरं
Join us  
Trending Stories
1
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
2
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
3
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
4
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
5
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
6
टेन्शन वाढलं! ताप, डोकेदुखीसह भूक लागत नाही?; 'हा' धोकादायक व्हायरस करू शकतो अटॅक
7
आम्ही फटाके आणले होते... रिंकू खूप दुःखी झालाय! भारतीय खेळाडूच्या वडिलांचा भावनिक Video 
8
T20 World Cup भारत जिंकणार नाही; दिग्गजाने जाहीर केले ४ सेमी फायनलिस्ट
9
‘’उबाठा गटाची अवस्था ‘नाच गं घुमा, कशी मी नाचू’ अशी झालीय, मनसेची बोचरी टीका 
10
T20 World Cup साठीच्या भारतीय संघ निवडीची Inside Story! हार्दिक पांड्याच्या नावावर... 
11
Breaking: सलमान खानवर गोळीबार प्रकरण; आरोपींपैकी एकाची पोलिस कोठडीत आत्महत्या
12
Maneka Gandhi : "फक्त 2 दिवस बाकी..."; अमेठीतून राहुल, रायबरेलीतून प्रियंका, काय म्हणाल्या मनेका गांधी?
13
Multibagger stock: ₹६ च्या शेअरनं दिलं छप्परफाड रिटर्न; ₹१ लाखांचे बनले ₹१ कोटी, गुंतवणूकदारांची चांदी
14
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
15
सिंधुदुर्गात ठाकरे गटाचं बळ वाढणार, राणेंना आव्हान देणारा जुना शिवसैनिक घरवापसी करणार 
16
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
17
Fact Check: नेपाळ संसदेत पंतप्रधान मोदींवर झाली नाही टीका; जाणून घ्या व्हायरल Videoचे 'सत्य'
18
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
19
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
20
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला

Coronavirus : जनता कर्फ्यूला देशभरात सुरुवात; संसर्ग टाळण्याच्या मोहिमेत लोकांचा उत्स्फूर्त सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 5:30 AM

Coronavirus : अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले.

मुंबई/नवी दिल्ली : कोरोना विषाणुच्या संसर्गाचा एकजुटीने व एकदिलाने सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार जनता कर्फ्यूला रविवारी सकाळी सुरुवात होणार असली तरी शनिवारी सकाळपासूनच महाराष्ट्रासह देशभरात अघोषित संचारबंदी सुरू झाली होती. आपापल्या गावी निघून जाणाऱ्यांची रेल्वे स्थानकांवर झालेली गर्दी वगळता देशभरात सामसूम व शुकशुकाटच होता.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. बहुतांश ठिकाणी लोकांनी स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळले. मात्र आदेशानंतरही ज्यांनी दुकाने वा आस्थापने बंद ठेवली नाहीत, ती बंद करण्यास पोलिसांनी भाग पाडले. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व शहरे आणि ग्रामीण भागात जणू आजपासूनच लोकांनी बंद सुरू केला.

रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी स्वयंस्फूर्त असेल, यात वाद नाही. या काळात मुंबई व काही शहरांतील उपनगरी सेवा वगळता, एकही रेल्वेगाडी धावणार नाही. बहुतांश विमान उड्डाणे बंद असतील आणि परदेशांतून येणाºया सर्व विमानांना भारतात उतरण्यास शनिवार मध्यरात्रीपासूनच बंदी घालण्यात आली आहे. शिवाय प्रवासी असतील, तरच एसटीच्या बसेस सोडण्यात येतील.

कोरोना विषाणुचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये, एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे, यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्फ्यूची कल्पना मांडली आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी लोकांनी या कर्फ्यूमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.हा होईल परिणाम-

  • राज्यात दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलला
  • रेल्वेच्या ४0 टक्के
  • उपनगरी गाड्या रद्द
  • विमानसेवा पूर्ण बंद
  • आंतरराष्ट्रीय विमानांना
  • देशात प्रवेश नाही
  • एसटीच्या फेऱ्या गरजेनुसार
  • आंतरराज्य बसची ये-जा बंद
  • खासगी बसेसवर पूर्ण बंदी
  • दूर पल्ल्याच्या सर्व गाड्या बंद
  • खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांची तपासणी
  • रुग्णालयात दाखल
  • झालेल्या कोणालाही ताप, खोकला, सर्दी असल्यास
  • वा श्वासोच्छवासाचा त्रास असल्यास त्यांची कोरोनाशी संबंधित तपासणी होणार

राज्यात ६४ रुग्ण, शनिवारी आढळलेले नवे रुग्ण : १२

राज्यात कोरोनाचे पुण्यात २, मुंबईत ८, यवतमाळ व कल्याणमध्ये प्रत्येकी १ असे १२ नवीन रुग्ण शनिवारी आढळले. त्यामुळे आता राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. दरम्यान, होत असलेल्या संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.देशात ३२९ बाधित (यात बरे झालेले २३ व पाच मृत यांचा समावेश आहे.)

शनिवारी आढळलेले नवे रुग्ण : ६0

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सात हजार व्यक्तींचा देशात ठिकठिकाणी मागोवा घेतला जात आहे. त्यांच्या तपासणीतून सामुदायिक संसर्ग झाला आहे का, हे स्पष्ट होईल. तसे एखादे प्रकरण आढळले तरी सर्व तपासण्या अधिक कडक करणार.- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्र