शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: रेल्वे स्टॉलवर आता मास्क, सॅनिटायझर, उशा, बेडरोल आणि टॉवेलही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 19:40 IST

CoronaVirus: या सर्व वस्तू एक-एक वा एकत्रितपणे (किट) विकल्या जातील. सध्या काही मोठ्या स्थानकांवरील स्टॉलवर या वस्तू मिळतात.

नवी दिल्ली : यापुढे रेल्वे स्थानकांवरील स्टॉलवर प्रवाशांच्या सोयीसाठी मास्क, ग्लोव्ह्ज, सॅनिटायझर यांची विक्री करण्याचे रेल्वेने ठरविले आहे. याशिवाय रेल्वे स्टॉलवर उशा, बेडरोल, टॉवेल, स्वच्छतागृहांतील वस्तू, औषधे, अन्य प्रसाधने आणि पाकीटबंद खाद्यपदार्थही विकले जाणार आहेत.प्रवासाला निघताना या वस्तू घेण्याचे विसरतात. कोरोनाच्या संसर्गाच्या काळात सर्व प्रवाशांकडे मास्क, सॅनिटायझर तसेच ग्लोव्ह्ज असणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची तसेच काही औषधांची विक्री रेल्वे स्टॉलवर यापुढे केली जाईल. रेल्वे स्टॉलवर आतापर्यंत खाद्यपदार्थ मिळत असत. पण अनेक निर्बंधांमुळे ते बंद करण्यात आले आहे.आता मात्र पाकीटबंद खाद्यपदार्थही तिथे मिळतील आणि प्रवाशांचा मोठा प्रश्न सुटेल. कोरोना संसर्गामुळे रेल्वेच्या डब्यात उशा, टॉवेल, बेडरोल, नॅपकिन, ब्लँकेट देणे बंद झाले आहे. बऱ्याचदा प्रवाशांना याची माहिती नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रेल्वे स्टॉलवर या वस्तूही विकत मिळू शकतील. या सर्व वस्तू एक-एक वा एकत्रितपणे (किट) विकल्या जातील. सध्या काही मोठ्या स्थानकांवरील स्टॉलवर या वस्तू मिळतात. पण आता सर्वच रेल्वे स्थानकांवर त्या मिळू शकतील, असे सांगण्यात आले. रेल्वे स्टॉलवर विकल्या जाणा-या वस्तूंचा दर्जा चांगला असावा. खाद्यपदार्थही ताजे व चांगले असावेत, तसेच ते कधी तयार करण्यात आले आहेत आणि किती काळपर्यंत खाण्यास योग्य आहेत, याची माहिती त्या पाकिटांवर असणे बंधनकारक आहे.कोरोना संकटाच्या काळात प्रवाशांना प्रवासादरम्यान काही विशिष्ट वस्तूंची गरज भासू शकते. काहीवेळा अशा वस्तू प्रवासी घरातच विसरतात. त्या दृष्टीनं रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्सवर मास्क, सॅनिटायझर तसेच ग्लोव्ह्ज विक्रीस ठेवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली. या वस्तू एमआरपीनुसार विकल्या जातील आणि त्यात कोणतीही नफेखोरी होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. (फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचे कुठलेही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या