CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 10:16 AM2020-06-08T10:16:04+5:302020-06-08T10:19:49+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अशातच बाजारात सध्या एक खास मिठाई आली आहे. 

CoronaVirus Marathi News westbengal special immunity boosting sweet fight covid19 | CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

CoronaVirus News : कोरोनाशी लढण्यासाठी 'ही' खास मिठाई मदत करणार; रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार?

Next

कोलकाता - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. सध्या देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही दोन लाखांच्याव गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, मास्क, क्वारंटाईन असे खबरदारीचे उपाय केले जात आहेत. तसेच काळजी घेण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे. कोरोनाशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. अशातच बाजारात सध्या एक खास मिठाई आली आहे. 

कोरोनाशी लढण्यासाठी खास मिठाई मदत करणार असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. पश्चिम बंगालच्या कोलकातामधील एका मिठाई विक्रेत्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करेल अशी मिठाई तयार केली आहे. 11 हर्ब्सपासून 'संदेश' नावाची खास मिठाई तयार करण्यात आली आहे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असा दावा मिठाई विक्रेत्याने केला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळेच अशा पद्धतीची मिठाई तयार करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली आहे.   

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संदेश मिठाईत तुळस, हळद, वेलची, जायफळ, आलं, काळी मिरी, जिरं, तमालपत्र अशा हर्ब्स वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये साखर किंवा गूळ वापरलेला नाही. तर मधाचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरून मिठाईत वापरलेल्या हर्ब्समधीलपोषक घटक कायम राहतील. संदेश मिठाईही मिष्टी दही, रसगुल्ल्याप्रमाणेच प्रसिद्ध अशी बंगाली मिठाई आहे. 

संदेश तयार करणाऱ्या मिठाईच्या दुकानाचे प्रमुख सुदीप मल्लिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही हर्ब्सचे महत्त्व जाणून घेतलं. भारतात या औषधांचा उपयोग मसाले म्हणून केला जातो. हे हर्ब्स आजारांशी लढण्याची क्षमता देतात. याचा वापर करून खास मिठाई तयार केली आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि कोरोना व्हायरशी लढण्यास मदत मिळू शकेल." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Today's Fuel Price: इंधन दराचे 'अच्छे दिन' संपले, पेट्रोल-डिझेल आज पुन्हा महागले!

CoronaVirus News : ब्लड प्रेशर असलेल्या कोरोनाग्रस्तांना 'ही' चूक पडेल महागात; वेळीच व्हा सावध

CoronaVirus News : लढ्याला यश! भारताने विकसित केलं स्वस्त कोरोना चाचणी किट; अवघ्या 20 मिनिटांत मिळणार रिझल्ट

मद्यप्रेमींसाठी खूशखबर! दारू स्वस्त होणार, 'कोरोना शुल्क' हटवणार; 'या' सरकारने घेतला निर्णय

30 जून आधी पूर्ण करा 'ही' 7 महत्त्वाची कामं, नाहीतर होईल मोठं नुकसान

 

Web Title: CoronaVirus Marathi News westbengal special immunity boosting sweet fight covid19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.