शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 18:38 IST

देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

ठळक मुद्देपॉल यांनी कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या कुठल्याही क्षणी स्थिर होऊ शकते, असे म्हटले आहेलॉकडाउनचा खरा हेतू, कोरोना व्हायरसची चैन तोडणे आहे, असेही पॉल म्हणालेदेशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. असे असतानाच, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लवकरच कुठल्याही क्षणी स्थिर होऊ शकते, असे म्हटले आहे. याच बोरोबर, पहिल्या आणि दुसऱ्या पायऱ्यांच्या प्रतिबंधांमुळे जो फायदा झाला आहे, तो कायम ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाल. 

'या'मुळे वाढवण्यात आला लॉकडाउन -पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, लॉकडाउनचा खरा हेतू, कोरोना व्हायरसची चैन तोडणे, असा आहे. यामुळेच 3 मेनंतरही लॉकडाउनचा काळ वाढवण्यात आला. मात्र, लॉकडाउन एकदमच हटवला असता, तर हेतू साध्य झाला नसता. तसेच जेथे चांगली स्थिती आहे, तेथे लक्षपूर्वक लॉकडाउन काढण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. 

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

यावेळी पॉल यांना विचारण्यात आले, की भारतात  कम्युनिटी ट्रांसमिशन अर्थात कोरोना तीसऱ्या टप्प्यावर गेला का? यावर त्यांनी सरळ उत्तर देणे टाळले आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही प्रतिबंधात्मक रणनीतीनुसारच असल्याचे सांगितले.

पूर्वीच्या तुलनेत चांगली स्थिती -पॉल म्हणाले, आपण लॉकडाउनपेक्षाची चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहोत. लॉकडाउनपूर्वी दर 5  दिवसाला कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत होती. आता दुपटीचा रेट 11-12 दिवसांवर गेला आहे. आशाप्रकारे कोरोना व्हायरस पसरण्याचा दर कमी झाला असून तो कधीही स्थिर होऊ शकतो.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारच्या नजीक - देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 66 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNIti Ayogनिती आयोगIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी