शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

कोरोनाचा सामना : पंतप्रधान मोदींची महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक, तयार केला 'मेगा प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 15:48 IST

ही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे ही बैठक महत्वाची आहे.

ठळक मुद्देही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे.कोरोनाविरोधातील लढाई योग्य प्रकारे सुरू असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेला आहे.सक्रिय रुग्णांचा टक्का कमी झाला आहे. रिकव्हरी रेट वाढत आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना व्हायरस महामारीसंदर्भात 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली. यानंतर, कोरोनावर राज्यांसोबत काम सुरू असून, ही लढाई योग्य प्रकारे चालली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटेला आहे. या बैठकीत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी  झाले होते. 

ही सर्व रज्ये दाटीवाटीच्या लोकसंख्या असलेली आहेत. तसेच येथे कोरोनाबाधिक रुग्णांची संख्याही अधिक आहे. यामुळे ही बैठक महत्वाची आहे.

देशातील रिकव्हरी रेट वाढतोय -सक्रिय रुग्णांचा टक्का कमी झाला आहे. रिकव्हरी रेट वाढत आहे. याचाच अर्थ आपले प्रयत्न यशस्वी सिद्ध होत आहेत. ज्या राज्यांत तपासणी दर कमी आहे आणि जेथे पॉझिटिव्ह रेट अधिक आहे. तेथे टेस्टिंग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे समोर आले आहे. विशेषतः बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगाना या राज्यांत टेस्टिंग वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच आज टेस्टिंग नेटवर्क शिवाय आरोग्य सेतू अ‍ॅपही आपल्याकडे आहे. या अ‍ॅपच्या माध्यमानेही आपण हे काम सहजपणे करता येऊ शकते. यासंदर्भात या समीक्षा बैठकीत चर्चा झाली. 

देश ही लढाई नक्कीच जिंकेल -आज या प्रयत्नांचे परीणाम आपण पाहत आहोत. रुग्णालयांतील उत्तम व्यवस्थापन, तसेच आयसीयू बेड्सची संख्या वाढवण्यासारख्या प्रयत्नांचीही मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे. आपल्या राज्यांत प्रत्यक्ष स्थितीवर लक्षदिल्याने जे परिणाम समोर आले आहेत. त्यातूनच यशाचा मार्ग तयार होत आहे. मला आशा आहे, की  आपल्या या अनुभवाच्या ताकदीने देश ही लढाई पूर्णपणे जिंकेल आणि एक नवी सुरुवात होईल, असे मोदी म्हणाले. 

देशात एका दिवसात समोर येणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येत घट - या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते. कोरोनाने देशात डोके वर काढल्यापासून आजपर्यंत पंतप्रधान मोदींची राज्यांबरोबरची ही सातवी बैठक आहे. देशात एका दिवसात समोर येणाऱ्या करोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. मंगळवारी हा आकडा 53,601 होता. देशात गेल्या चार दिवसांपासून सातत्याने 60,000 हून अधिक रुग्ण समोर येत होते.

महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 9 हजार 181 रुग्ण -महाराष्ट्रात सध्या 10 लाख 1 हजार 268 लोक घरगुती अलगीकरणात आहेत, तर 35,521 लोक संस्थात्मक अलगीकरणात आहेत. राज्यात सोमवारी दिवसभरात कोरोनाचे 9 हजार 181 रुग्ण आढळले, तर 293 जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाख 24 हजारच्या पुढे - कोरोनाबाधितांची एकूण संख्या 5 लाख 24 हजार 513 झाली असून एकूण 18,050 जणांनी जीव गमावला. दिवसभरात 6 हजार 711 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 3 लाख 58 हजार 421 रुग्ण कोविडमुक्त झाले.

मुंबईत आणखी 46 बळी -मुंबईत दिवसभरात 925 बाधित तर 46 मृत्यूंची नोंद झाली. एकूण रुग्णसंख्या 1 लाख 24 हजार 307 असून बळींचा आकडा 6,845 आहे. आतापर्यंत 97,993 रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर 78 टक्के झाला असून रुग्ण दुपटीचा दर 87 दिवसांवर गेला आहे. दरम्यान, मुंबईत सेरो सर्वेक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: आता राज्यात आवाजाच्या सहाय्याने होणार कोरोना टेस्ट, आदित्य ठाकरेंनी केलं ट्विट

व्वा! : भारतासह 'या' देशांत तयार होतेय नाकातून टाकता येणारी कोरोना लस, असं करते काम

CoronaVaccine : लठ्ठ लोकांवर परिणामकारक ठरणार नाही कोरोना लस? संशोधकांनी व्यक्त केली शक्यता

दारू सोडण्यासाठी वापरलं जाणारं औषध, आता कोरोनाविरोधात ठरणार उपयोगी; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus vaccine : 50 टक्के प्रभावी ठरली तरी लोकांना दिली जाणार कोरोना लस

CoronaVirus vaccine : रशियाने इंग्लंड-अमेरिकेला टाकले मागे! भारतालाही पुरवणार कोरोना लस

खूशखबर : 10 ऑगस्टपर्यंत येऊ शकते 'रशियन' कोरोना लस?; आरोग्य मंत्री म्हणाले, परीक्षण पूर्ण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशwest bengalपश्चिम बंगाल