शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2020 10:19 IST

सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे.

ठळक मुद्देभारतावर अमेरिकेसारखी परिस्थिती कोसळू नये यासाठी सोशल डिस्‍टंसिंग आणि कन्टेंमेन्ट स्‍ट्रॅटजी अधिक प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता  मार्च महिन्यानंतर टेस्टिंग आणि डेडिकेटेड कोरोना रग्णालयांची संख्या वाढली आहे. मात्र, ते पुरेसे नाही.भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, आता केंद्र सरकार राज्‍यांसह एकत्रितपणे  मेडिकल इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चरमध्ये अधिक सुधारणा करणार आहे. पुढील दोन महिन्यात संपूर्ण देशातच मनसून पोहोचलेला असेल. तेव्हा ज्या शहरांमध्ये अधिक कोरोनाबाधित आहेत अथवा शेकडो हॉटस्पॉट्स आहेत, अशा शहरांवर प्रामुख्याने लक्ष राहील. हा निर्णय शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या समीक्षा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावरील उपचार आणि व्यवस्थापण अधिक चांगले कसे करता येईल, यासंदर्भात चर्चा झाली.

CoronaVirus News: खुशखबर! मॉडर्नाची कोरोना व्हॅक्सीन अखेरच्या टप्प्यात, 'या' महिन्यात मिळू शकते 'गुड न्यूज'

भारता अमेरिका होऊ द्यायचे नाही -देशातील कोरोना रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. हा वेग असाच वाढत राहिला, तर भारताची स्थिती अमेरिकेसारखी, किंबहूना त्याहूनही विदारक व्हायला वेळ लागणार नाही. भारतावर अमेरिकेसारखी परिस्थिती कोसळू नये यासाठी सोशल डिस्‍टंसिंग आणि कन्टेंमेन्ट स्‍ट्रॅटजी अधिक प्रभावीपणे लागू करण्याची आवश्यकता आहे. या समीक्षा बैठकीत वरिष्‍ठ मंत्री आणि अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी अनेक शक्यतांवर चर्चा करण्यात आली. मार्च महिन्यानंतर टेस्टिंग आणि डेडिकेटेड कोरोना रग्णालयांची संख्या वाढली आहे. मात्र, ते पुरेसे नाही.

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

कोरोनाबाधितांच्या रोजच्या संख्येत वाढ होऊ नये यावर लक्ष -सध्या देशात कोरोना केसेस वाढण्याची शक्यता आहे. या बैठकीत अधिकारी म्हणाले, जर कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांचा असता, तर आतापर्यंत देशात 10 लाक रुग्ण झाले असते. या रुग्णांमध्ये गुणाकार होऊ नये हा सरकारचा प्रयत्न आहे. यावेळी नीती आयोगाचे सदस्य आणि मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेन्ट प्‍लॅनच्या ग्रुपचे, विनोद पॉल यांनी सध्याची स्थिती आणि संभाव्य स्थितीसंदर्भात सविस्‍तर प्रेझेन्टेशन केले.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

पाच राज्यांतच दोन तृतियांश कोरोनाबाधित -पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे, की "एकूण कोरोनाबाधितांपैकी दोन तृतियांश कोरोनाबाधित पाच राज्यांतच आहेत आणि तेही विशेषतः मोठ्या शहरांत. यावेळी दिवसागणिक वाढणाऱ्या रुग्ण संख्येचा विचार करता बेड्सची  संख्या आणि सेवा अधिक चांगल्या करण्यासंदर्भात चर्चा झाली." पंतप्रधानांनी शहर आणि जिल्यांतील रुग्णालये आणि आयसोलेशन बेड्सच्या आवश्यकतेसंदर्भातही जाणून घेतले. त्यांनी आरोग्य मंत्रालयाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत एकत्रितपणे पुढील नियोजन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत.

CoronaVirus News: सर्दी-खोकल्याच्याही आधी दिसू शकतात कोरोनाची 'ही' अतिगंभीर लक्षणं, नव्या अभ्यासाचा दावा

भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक -भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या तीन लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. दिल्लीसह विविध राज्यांमध्ये कोरोना साथीची स्थिती कशी आहे, प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध किती प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत, किती उद्योगधंदे सुरू झाले, अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत घेतली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार