शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

पतंजलीकडे कोरोनाचं औषध तयार; हजारो रुग्ण बरे झाल्याचा आचार्य बालकृष्ण यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 19:00 IST

आचार्य बालकृष्ण म्हणाले, कोरोना महामारी चीनसह संपूर्ण जगात पसरताच आपण आपल्या संस्थेतील प्रत्येक विभागाला केवळ आणि केळव कोरोनावरील उचारासाठी उपयोगी पडेल, अशा औषधांवर काम करण्याच्या कामाला लावले.

ठळक मुद्देयै औषधाने 80 टक्के लोक ठणठणीत बरे झाले आहेत.बालकृष्ण यांनी सांगितले कसे तयार करण्यात आले औषध.या औषधाचे केवळ यशस्वी परिक्षणच केले गेले नाही, तर है औषधही तयार करण्यात आले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवरील औषध तयार करण्यासाठी भारतासह जगातील अनेक देश कंबर कसून दिवस-रात्र एक करत आहेत. या महामारीची लस एका वर्षात तयार होईल, असा दावाही केला जात आहे. मात्र अशातच, पतंजली आयुर्वेदचे संस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी एक नवा दावा केला आहे.

1 हजार हून अधिक रुग्ण बरे -आचार्य बालकृष्ण यांनी दावा केला आहे, की पंतजलीने कोरोनावरील औषध तयार करण्यात यश मिळवले आहे. एवढेच नाही, तर या औषधाने 1 हजार हून अधिक रुग्ण बरे झाले असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अनेक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना हे औषध देण्यात आले. यांपैकी 80 टक्के लोक ठणठणीत झाले आहेत, असेही बालकृष्ण म्हणाले. 

परिक्षणच नाही, औषधही तयार -आचार्य बालकृष्ण म्हणाले, कोरोना महामारी चीनसह संपूर्ण जगात पसरताच आपण आपल्या संस्थेतील प्रत्येक विभागाला केवळ आणि केळव कोरोनावरील उचारासाठी उपयोगी पडेल, अशा औषधांवर काम करण्याच्या कामाला लावले. याचा परिणाम आज समोर आला आहे. तसेच, या औषधाचे केवळ यशस्वी परिक्षणच केले गेले नाही, तर है औषधही तयार करण्यात आले आहे.

बालकृष्ण यांनी सांगितले असे तयार करण्यात आले औषध -आचार्य बालकृष्ण म्हणाले, शास्त्र आणि वेदांचा अभ्यास करून, त्यांना विज्ञानाच्या कसोटीवर ठेवून आयुर्वेदिक गोष्टींचा अभ्यास करून हे औषध तयार करण्यात आले आहे. ते म्हणाले, हे औषध तयार करण्यासाठी पतंजलीचे शेकडो वैज्ञानिक दिवस-रात्र एक करून काम करत होते.

पतंजली संशोधन केंद्राचे मुख्य वैज्ञानिक म्हणाले - पतंजली संशोधन केंद्राच्या मुख्य वैज्ञानिकाने सांगितल्यानुसार, चीनमध्ये कोरोनाची सुरुवात होताच, जानेवारी महिन्यात आम्ही कामाला लागलो होते. शेकडो वैज्ञानिकांनी दिवस-रात्र काम केले. या कठोर परिश्रमामुळेच आम्ही हे औषध तयार केले आहे. या औषधाने हजारावर रुग्ण बरे झाले आहेत.

यापूर्वी, माझ्याकडे कोरोना बरा करण्याचा उपाय आहे. माझ्याकडे असलेले औषध १०० टक्के गुणकारी आहे, असा दावा पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांनी बुधवारी केला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpatanjaliपतंजलीBaba Ramdevरामदेव बाबाmedicineऔषधंmedicinesऔषधं