CoronaVirus News: देशभरात २४ तासांत, ५० हजारांहून कमी रुग्ण, तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2020 06:27 AM2020-10-21T06:27:27+5:302020-10-21T06:28:41+5:30

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे.

CoronaVirus Marathi News the number of patients decreased after three months in 24 hours less than 50,000 patients Across the country | CoronaVirus News: देशभरात २४ तासांत, ५० हजारांहून कमी रुग्ण, तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट

CoronaVirus News: देशभरात २४ तासांत, ५० हजारांहून कमी रुग्ण, तीन महिन्यांनंतर रुग्णसंख्येत घट

Next


नवी दिल्ली : देशात जवळपास तीन महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची २४ तासांतील संख्या ५० हजारांपेक्षा कमी आली आहे. गत २४ तासांत देशात ४६,७९० नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णांची संख्या ७५,९७,०६३ एवढी झाली आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींवर पोहोचली असून एकूण मृत्यू ११ लाख २४ हजार झाले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गत २४ तासांत ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १,१५,१९७ झाली आहे. देशात यापूर्वी ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण २८ जुलै रोजी दिसून आले होते. त्यादिवशी ४७,७०३ नवे रुग्ण आढळून आले होते. देशात एका दिवसात मृत्युमुखी पडणाºया रुग्णांची संख्या सलग दुसºया दिवशी ६०० पेक्षा कमी झाली आहे. देशात कोरोनामुक्त झालेल्या लोकांची संख्या ६७ लाखांपेक्षा अधिक झाली आहे. तर, उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या सलग चौथ्या दिवशी ८ लाखांपेक्षा कमी झाली आहे.

एकूण रुग्ण - 7,48,538
देशात उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ७,४८,५३८ झाली आहे. ही संख्या रुग्णांच्या ९.८५ टक्के आहे.

देशात ६७,३३,३२८ लोक या आजारातून बरे झाले आहेत. यामुळे राष्ट्रीय स्तरावर रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ८८.६३ टक्के झाला आहे. तर, मृत्यूदर १.५२ टक्के आहे.

५७९ नव्या मृत्यूंपैकी महाराष्ट्रात १२५, कर्नाटक ६४, पश्चिम बंगाल ६३, छत्तीसगड ५६, तामिळनाडू ४९, दिल्लीत ३१ जणांचा मृत्यू झाला.

महाराष्ट्रात आतापर्यंत 42,240 मृत्यू झाले आहेत. देशातील मृत्यूंपैकी ७० टक्के मृत्यू हे रुग्णाला अन्य आजार असल्यामुळे झाले आहेत.

 

Web Title: CoronaVirus Marathi News the number of patients decreased after three months in 24 hours less than 50,000 patients Across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.