शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये देशभरात अडकलेल्या मजुरांची संख्या किती?; मोदी सरकारनं दिली 'धक्कादायक' माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:42 IST

CoronaVirus marathi News: देशभरात कोट्यवधी मजूर लॉकडाऊनमुळे अडकले

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. वाहतूक सेवा पूर्णपणे बंद असल्यानं देशभरात स्थलांतरित मजूर अडकून पडले. या मजुरांना त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी सुरू केल्याच्या अनेक घटना देशभरातून समोर आल्या. यातील काही जणांचा जीव गेल्याच्या दुर्दैवी घटनादेखील घडल्या. यानंतर केंद्र सरकारनं श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या. मात्र देशभरात किती मजूर अडकले आहेत, याबद्दलची विचारणा आरटीआयच्या माध्यमातून केल्यानंतर केंद्र सरकारनं धक्कादायक माहिती दिली. अडकलेल्या मजुरांच्या संख्येबद्दल कोणतीही आकडेवारी नसल्याचं उत्तर माहिती अधिकारांतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला देण्यात आलं.देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी त्यांची नेमकी संख्या माहिती असणं गरजेचं आहे. याबद्दल केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मुख्य श्रमायुक्तांनी (सीएलसी) यांनी घाई गडबडीत ८ एप्रिलला एक पत्रक काढलं. देशभरातल्या २० विभागीय श्रमायुक्तांनी (आरएलसी) त्यांच्याकडे असलेल्या संसाधनांचा वापर करुन तीन दिवसांमध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची संख्या द्यावी, अशी सूचना पत्रकात होती.लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांची जिल्ह्यावार आणि राज्यवार माहिती एकत्र करण्याच्या दृष्टीनं मुख्य श्रमायुक्तांनी पत्रक काढलं होतं. मात्र स्थानिक श्रमायुक्तांनी याबद्दलची आकडेवारी जमा केली नसल्याचं एका माहिती अधिकारातून समोर आली आहे. कॉमनवेल्थ ह्यूमन राईट एनिशिएटिव्हच्या (सीएचआरआय) व्यंकटेश नायक यांनी अडकलेल्या मजुरांची संख्या जाणून घेण्यासाठी आरटीआयच्या अंतर्गत ४ एप्रिल २०२० रोजी  अर्ज केला. ५ मे २०२० रोजी त्यांनी उत्तर मिळालं. तुम्ही मागितलेल्या माहितीबद्दल आमच्याकडे कोणतीही आकडेवारी नसल्याचं त्यांना केंद्रीय लोक माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.चला एकत्र केंद्राकडे जाऊ, IFSC मुंबईत आणू; भाजपा नेत्याचं ठाकरे सरकारला आवाहनअमित ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन; काकांकडून पुतण्याला महत्त्वाचं आश्वासनमुंबई अन् पुण्यासह विविध जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांना लवकरच गावी पोहोचवणार लालपरी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या