शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आनंदाची बातमी; कोरोनाचा सामना करताना देशाला 'या' तीन पायऱ्यांवर मिळत आहे येश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 19:41 IST

वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढलाआतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यूआतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत

नवी दिल्ली : कोरोनाविरोधात लढताना देशाच्या दृष्टीने एक आनंदाची बातमी आहे. या लढाईत भारताला, कोरोना बाधितांचा डबलिंग रेट, रिकव्हरी रेट आणि डेथ रेट, या तीन महत्वाच्या पायऱ्यांवर यश मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी या तिन्हींचेही वेगवेगळे आकडे समोर ठेवले. यावरून, कोरोना विरोधातील लढाईत भारताला मोठे यश मिळत आहे, हे स्पष्ट होते.

रुग्ण संख्या दुप्पट होण्यातील कालावधी वाढला -अग्रवाल म्हणाले, कोरोना बाधितांच्या डबलिंग रेटचा विचार करता, लॉकडाउनपूर्वी देशातील डबलिंग रेट 3.4 दिवस, असा होता. तो वाढून आता 11 दिवस झाला आहे. याहूनही चागली गोष्ट म्हणजे, काही राज्यांचा डबलिंग रेट हा देशाच्या सरासरीपेक्षाही अधिक आहे. 'दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तामिळनाडू आणि पंजाबमध्ये 11 ते 20 दिवसांचा डबलिंग रेट आहे. कर्नाटक, लद्दाख, हरियाणा, उत्तराखंड आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांचा डबलिंग रेट 20 ते 40 दिवसांपर्यंत आहे. तर आसाम, तेलंगाणा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशात हाच रेट 40 दिवसांपेक्षाही अधिक आहे.'

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

78 टक्के मृतांमध्ये इतर आजारही -अग्रवाल म्हणाले, आतापर्यंत देशात 3.2 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 65 टक्के पुरुष तर 35% महिलांचा समावेश आहे. वयाचा विचार करता 45हून कमी वय असलेल्या 14 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 45 ते 60 वर्षंच्या 34.8 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 60 वर्षांहून अधिक वय ज्यांचे आहे, अशा 51.2 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यात 60-75 वर्षांमधील 42 टक्के, तर 75हून अधिक वय असलेल्या 9.2 टक्के लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे मरणारांपैकी 78 टक्के रुग्ण इतर कोणत्याना कोणत्या आजाराने ग्रस्त होते. आतापर्यंत एकूण 1,074 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

लवकरच 25000 लोकांसह रॅली करणार, लॉकडाउन उठवण्याच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प ठाम

रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 1823 नवे रुग्ण आढळले आहेत. आता एकूण रुग्णांची संख्या 33610 झाली असून यापैकी 24162 अॅक्टिव्ह आहेत. आतापर्यंत देशात 8,373 रुग्ण बरेही झाले आहेत. अशा प्रकारे, देशातील रिकव्हरी रेट वाढून 25.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. 14 दिवसांपूर्वी रिकव्हरी रेट केवळ 13.06 टक्के होता. या आकडेवारीवरून स्पष्ट होते, की देशाला रिकव्हरीच्या बाबतीतही यश मिळत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतdoctorडॉक्टरDeathमृत्यू