शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा! कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर 2 महिन्यांनी तब्येतीची केली विचारपूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 12:18 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांकडे आता मृतांची तब्येत कशी आहे याची चौकशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 2,95,10,410 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 70,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3921 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,74,305 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली आहेत. काही ठिकाणी आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांकडे आता मृतांची तब्येत कशी आहे याची चौकशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कोरोनाग्रस्तांना फोन करुन त्यांच्या आरोग्यासंदर्भात विचारपूस करणाऱ्या यंत्रणेची पोलखोल करणारे काही धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. दोन महिन्यापूर्वी करोना  पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण बरे झालेत की त्यांचा मृत्यू झालाय याचा तपास आरोग्य यंत्रणेमार्फत आता फोनवरुन केला जात आहे. या सर्व गोंधळामध्ये आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेले नातेवाईक नाराज झाले आहेत. काही जण कॉलला प्रतिसाद देत नाहीत. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वागणुकीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून फोन केले जात आहेत. फोनवरुनच कोरोना रुग्णाच्या आरोग्याची चौकशी केली जात आहे. गोमतीनगर येथील रहिवाशी आणि बलरामपूर रुग्णालयाचे माजी आरोग्य अधीक्षक डॉ. डी. पी. मिश्रा यांची पत्नी कुमुद मिश्रा यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 27 एप्रिल रोजी उपचारादरम्यान कुमुद यांचं निधन झालं. कोविन पोर्टलवर कुमुद यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अपलोड करुन दीड महिना झाल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली.  कुमुद यांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाने नुकताच डॉ. डी. पी. मिश्रा यांना फोन केला होता. 

आशियाना येथे राहणाऱ्या सरिता द्विवेदी यांना एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आला होता. मागील आठवड्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी फोनवरुन सरिता यांच्या आरोग्यासंदर्भातील माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सरिता यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. अशी दोनच प्रकरणं नाहीत तर अनेक अशा रुग्णांना सध्या फोन करुन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली जात आहेत जे महिन्याभरापूर्वीच कोरोनामुक्त होऊन रुग्णालयांमधून घरी परतले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूIndiaभारत