शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:02 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

हैदराबाद - भारतातही कोरोना आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत.

तेलंगणामधील एका मुलाने आपल्या आईचा सांभाळ करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तिला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिरुमाला लिंगस्वामी असं या 45 वर्षीय मुलाचं नाव असून लॉकडाऊनमुळे त्याची नोकरी गेली होती. रोजगार नसल्याने गेल्या काही दिवसांपासून त्याला पैशांची गरज भासत होती. मात्र पुरेसे पैसे नसल्यामळे त्याने आईला जाळण्याचं भयंकर कृत्य केलं आहे. लिंगस्वामीने आपल्या बहिणींना फोन करुन मी आता आईची काळजी घेऊ शकत नाही असं सांगितलं होतं. त्यानंतर त्याने टोकाचं पाऊल उचललं आणि तो फरार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, लिंगस्वामीची आई 65 वर्षीय आई शांतम्मा ही पाच वर्षांपूर्वी पडल्यामुळे त्यांचं हाड मोडलं होतं. त्या अंथरुणावर पडून असायच्या लिंगस्वामी आणि त्याच्या तीन बहिणींनी आईची काळजी घेण्यासाठी एका केयरटेकरची नेमणूक केली होती. मात्र वेळच्या वेळी पैसे मिळत नसल्यामुळे त्यानेही कामावर येणं बंद केलं होतं. शेजारील गावात राहणारी लिंगस्वामीची बहीण आठवड्यातून एकदा येऊन आईला आंघोळ घालण्यापासून सर्व काम करत होती, पण त्याव्यतिरीक्त शांतम्मा या घरात एकट्याच राहत होत्या. 

नालगोंडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उप-निरीक्षक राजेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार,  लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर लिंगस्वामी काही दिवस हैदराबादमध्ये राहिला होता. मजुरांना प्रवासाची परवानगी दिल्यानंतर लिंगस्वामी आपल्या घरी परतला. मात्र लॉकडाऊन काळात आईची मदत करण्यासाठी बहिणींना येणं शक्य होत नव्हते. पैसे नसल्यामुळे तो काही काळ अस्वस्थ झाला आणि यातूनच टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : 'खजिन्याची पेटी उघडा, गरजुंना मदत करा'; सोनिया गांधींचं मोदी सरकारवर टीकास्त्र

CoronaVirus News : कोरोनाग्रस्तांचा आकडा 57 लाखांवर; 'या' देशात एकही मृत्यू नाही तर काही ठिकाणी गंभीर स्थिती

संतापजनक! हा कसला बाप?... 2 महिन्यांच्या बाळाला 22 हजारांना विकलं; कारण वाचून बसेल धक्का

CoronaVirus News : ...म्हणून चिमुकल्यांना मास्क घालू नका; आरोग्य तज्ज्ञांनी दिला पालकांना सल्ला

CoronaVirus News : भयंकर! 'तो' आयसोलेशन वॉर्डमधून पळाला, गावभर फिरला; कोरोना पॉझिटिव्ह आला...

CoronaVirus News : बापरे! 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTelanganaतेलंगणाDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस