CoronaVirus Marathi News India's total cases surge to 79,09,960 | CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; नव्या रुग्णांच्या संख्येत झाली घट

नवी दिल्ली - जगात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून अनेक देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. कोरोना व्हायरसने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काही दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाचा धोका वाढला असून रुग्णांची संख्यादेखील वाढत होती. मात्र आता सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 79,09,960 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी (26 ऑक्टोबर) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 79,09,960 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,19,014 पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 6,53,717 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 71,37,229 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. 

आनंदाची बातमी! कोरोना हरणार, देश जिंकणार, तब्बल 70 लाख लोकांनी केली व्हायरसवर मात

देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र याच दरम्यान दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोनाच्या संकटात सुखावणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 79 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात केलल्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

देशभरात 70 लाखांहून अधिक लोकांनी व्हायरसवर मात करून कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे. उपचारानंतर कोरोनातून ठीक झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नवीन रुग्णांपेक्षा रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण हे आता जवळपास 90 टक्के झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या या आकडेवारीने संकटात मोठा दिलासा दिला आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Marathi News India's total cases surge to 79,09,960

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.