शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

CoronaVirus News: देशातील या 'तीन' राज्यांत कोरोनाची दुसरी लाट; दसरा, दिवाळीत घालणार थैमान - तज्ज्ञांचा इशारा

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 1, 2020 10:06 IST

Covid-19 : येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका, येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढण्याची शक्यता - तज्ज्ञ आंदाजराजधानी दिल्ली आणि केरळमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.महाराष्ट्रासह चार राज्यांतून येतेय गुड न्यूज.

नवी दिल्ली - देशात आजपासून अनलॉक-5ला (Unlock-5) सुरुवात झाली आहे. यावेळी चित्रपट गृहांना 50 टक्के क्षमतेसह  सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यातच केरळ आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असल्याने टेंशन वाढले आहे. एवढेच नाही, तर हा कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका आसून येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.

दिल्लीत जूनमध्ये वाढले होते सर्वाधिक रुग्ण - राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये आढळले. तेव्हा साधारणपणे रोज सरासरी 3000 नवे रुग्ण सापडत होते. यानंतर जुलैच्या सुरुवातीला आणि शेवटी रुग्णांची संख्या रोज कमी होताना दिसत होती. या दरम्यान दिल्लीत रोज जवळपास 1,000 रुग्ण आढळत होते. 

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसरी लाट?जुलैनंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यात दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढू लागली आणि 9 सप्टेंबरला दिल्लीत 4,039 नवे रुग्ण आढळले होते. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 2.5 लाखवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीत 3,827 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे, 'आम्हाला दिल्ली, पंजाब आणि केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट दिसत आहे.'

केरळही वाढवतोय टेंशन -केरळमध्येही कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांत येथे घट दिसून आली. मात्र, 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान येथे पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून आली. 23 ते 29 सप्टेंबरच्या आठवड्यात राज्यात 5,898 नवे रुग्ण समोर आले.

'या' चार राज्यांतून येतेय गुड न्यूज -आतापर्यंत कोरोनाची प्रचंड दहशत असलेली मोठी राज्ये,  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर घट होताना दिसत आहे. या शिवाय इतरही काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. 

पंजाबात पाच शहरं वाढवतायत टेंशन -पंजाबमध्ये मंगळवारी 16,824 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण होते. राज्यातील 5 शहरे लुधियाना, जालंधर, मोहाली, अमृतसर आणि पटियाला येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पंजाबात 3,359 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवारी राज्यात 1,100 नवे रुग्ण समोर आले होते. तर येथील रुग्णांचा एकून आकडा आता 1,12,460वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या