शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 11:36 IST

आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे.

ठळक मुद्देगेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत.गेल्या 24 तासांत देशात एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे.भारतात जवळपास 54 लाख लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत रोजच विक्रमी वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासांत जवळपास 11 हजार नवे रुग्ण सापडले, तर जवळपास 400 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाखच्या जवळ जाऊन पोहोचली आहे आणि याबरोबरच भारत  जगातला चौथा सर्वात मोठा कोरोना व्हायरस प्रभावित देश बनला आहे.

जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. यानंतर ब्राझीलल, रशिया आणि आता भारताचा नंबर आला आहे. भारताने शुक्रवारी युनायटेड किंगडम अर्थात इंग्लंडलाही मागे टाकले आहे.

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेले पाच देश -• अमेरिका - 20 लाख रुग्ण

ब्राझील - 8 लाख रुग्ण

• रशिया - 5 लाख रुग्ण

• भारत - 2.97 लाख रुग्ण

इंग्लंड - 2.92 लाख रुग्ण

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे.

• भारतात आतापर्यंत एकूण रुग्ण - 2,97,535

• एकूण अॅक्टिव्ह रुग्ण - 1,41,842

• आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 1,47,195

• आतापर्यंत झालेले मृत्यू - 8,498

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

गेल्या आठवड्यापासून भारतात रोज दहा हजारहून अधिक कोरोनाबाधित समोर येत आहेत. मात्र गेल्या 24 तासांत सर्व विक्रम तुटले आहेत. जगात ज्या देशांत आता रोज सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्यात भारतही सामील झाला आहे आणि तीसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत रोज 20 हजार, तर ब्राझीलमध्ये रोज जवळपास 15 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर त्याच्या खालोखाल भारताचा नंबर आहे. येथे रोज 10 हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत.

दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...

टेस्टिंगच्या बाबतीत आता भारताचाही वेग वाढताना दिसत आहे. आता भारतात जवळपास 54 लाख लोकांची कोरोना टेस्ट झाली आहे. सध्या एका दिवसाला जवळपास सरासरी दीड लाख टेस्ट होत आहेत. लवकरच हा वेग रोज 2 लाख टेस्टपर्यंत पोहोचेल. अमेरिका, रशिया आणि इंग्लंडनंतर टेस्टिंगच्या बाबतीत भारत चौथ्या नंबरवर आहे.

आता या 'स्वस्त' औषधाने होणार कोरोनाचा 'मस्त' इलाज? गोळीची किंमत फक्त 1 रुपया

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतAmericaअमेरिकाBrazilब्राझीलEnglandइंग्लंडDeathमृत्यू