शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

CoronaVirus News : धक्कादायक! 'या' 8 राज्यांत कोरोनाचे तब्बल 90 टक्के रुग्ण, 86 टक्के मृत्यू फक्त 6 राज्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 21:51 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्दे देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.आतापर्यंत 4,76,377 लोक बरे झाले आहेत.80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरस संक्रमणाने देशात थैमान घातले आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढतच चालला आहे. आतापर्यंत तब्बल 7.67 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4.76 लाख लोक बरे झाले असून 2.69 अॅक्टिव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी तब्बल 90 टक्के रुग्ण हे देशातील केवळ 8 राज्यांत समोर आले आहेत. 

कोरोनासंदर्भात तयार करण्यात आलेल्या मंत्री गटाने गुरुवारी सांगितले, की देशातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांपैकी तब्बल 90 टक्के रुग्ण हे केवळ महाराष्ट्र, तामिलनाडू आणि दिल्ली सह आठ राज्यांमध्ये आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 80 टक्के रुग्ण हे केवळ 49 जिल्ह्यांत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी जीओएमची केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली 18वी बैठक पार पडली. यात त्यांनी भारतातील कोरोनाच्या सद्य स्थितीवर माहिती दिली. 

देशातील 86 टक्के मृत्यू केवळ 6 राज्यांत -केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीओएमने माहिती दिली, की देशातील 86 टक्के कोरोनाबाधितांचे मृत्यू हे केवळ, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 6 राज्यांत झाले आहेत. तर 80 टक्के मृत्यू हे देशातील केवळ 32 जिल्ह्यात झाले आहेत.

देशातील या 8 राज्यांत 90 टक्के अॅक्टिव्ह रुग्ण -आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात 2,69,789 एवढे अॅक्टिव्ह कोरोनाबाधित आहेत. यापैकी 90 टक्के रुग्ण महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 7,67,296 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4,76,377 लोक बरे झाले आहेत. तर 21,129 लोकांचा मृत्यू झाला आहे. 

महाराष्ट्रात गुरुवारी 6 हजार 875 नवे कोरोनाबादित -महाराष्ट्रात गुरुवारी 6 हजार 875 कोरोना रुग्णांचे निदान झाले. तर 219 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बाधितांची संख्या 2 लाख 30 हजार 599 झाली असून बळींचा आकडा 9 हजार 667 झाला आहे. सध्या राज्यात 93 हजार 652 रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत 1 लाख 27 हजार 259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या -

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

CoronaVirus : धक्कादायक! कोरोनाचं नव रूप आलं समोर, अधिक वेगानं लोकांना करतोय संक्रमित; पण...

कोरोना तर पहिली लाट; जगाला भोगावे लागतील दूरगामी परिणाम - चीनची धमकी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्लीTamilnaduतामिळनाडू