शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र; कोरोनासाठी आवश्यक औषधं, उपकरणांवरून टॅक्स, ड्युटी हटवण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 14:14 IST

Coronavirus West Bengal : रुग्णांच्या उपचारासाठी उपकरणं, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची पंतप्रधान मोंदींकडे केली मागणी.

ठळक मुद्देरुग्णांच्या उपचारासाठी उपकरणं, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची पंतप्रधान मोंदींकडे केली मागणी.यापूर्वीही ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं होतं पत्र.

सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरील सध्या ताणही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे आणि औषधांवरील सर्व प्रकारचे कर आणि सीमा शुल्कात सूट देण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील लिहिलं आहे. याशिवाय त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा अधिक बळतट करण्यासाठी आणि कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी उपकरणे, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची मागणीही केली आहे. "मोठ्या संख्येने संस्था, लोक ऑक्सिजन सिलिंडर, कंटेनर आणि कोरोना संबंधित औषधे दान करण्यासाठी पुढे आली आहेत. अनेक दान देणाऱ्यांनी यावर लागणारे सीमा शुल्क आणि जीएसटीवर सूट देण्यासाठी विचार करण्यासाठी राज्य सरकारदरबारी विनंती केली आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. "यांच्या किंमती केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. च्यामुळे या सामानावर जीएसटी आणि सीमा शुल्क आणि अन्य शुल्कांमधून सूट देण्यात यावी. जेणेकरून कोरोना महासाथीच्या योग्य व्यवस्थापनासाठी जीवनावश्यक औषधं आणि उपकरणांचा पुरवठा वाढवणअयााठी मदत मिळेल," असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पत्र लिहून केले होते आरोपयापूर्वी शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु यानंतरही राज्याच्या हिस्स्याचा ऑक्सिजन केंद्र सरकार अन्य राज्यांना देत असल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला होता. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी पहिल्यांदा राज्यात १९ हजार २१६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे कोरोनामुळे ११२ जणांचा मृत्यू झाला होता. हे एका दिवसातील सर्वाधिक संख्या होती. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालOxygen Cylinderऑक्सिजन