शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

CoronaVirus News :मोदींच्या भारताकडे कोणी डोळे वटारून पाहू शकत नाही, भाजपाचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 2:40 PM

CoronaVirus : कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाविरुद्धच्या देशातील लढाईला खराब करून राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, भारतालाही त्याचा फटका बसला आहे. देशात टाळेबंदी असल्यानं अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा परिस्थितीत मोदी सरकार सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे या कोरोनाच्या संकटातही अनेक नेते राजकारण करत असल्याचं समोर आलं आहे. कोरोना विषाणूपासून ते अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीका करणाऱ्या राहुल गांधींवरही आता भाजपानं पलटवार केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्या आरोपांना एक एक करत उत्तर दिलं आहे. चीन आणि नेपाळच्या मुद्द्यावरून राहुल यांनी केंद्र सरकारला परिस्थिती स्पष्ट करण्यास सांगितले होते.त्यावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, 'नरेंद्र मोदींच्या भारताकडे कोणीही डोळे वटारून दाखवू शकत नाहीत'. कॉंग्रेस नेत्यांनी कोरोनाविरुद्धच्या देशातील लढाईला खराब करून राजकीय फायद्यासाठी जनतेची दिशाभूल केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. प्रसाद म्हणाले की, पंजाब आणि राजस्थानसारख्या कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम लॉकडाऊन लागू केले आहे. देशात या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत केवळ 4345 लोक मृत्युमुखी पडले आहेत. दुसरीकडे, जगात 3 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगातील 15 देशांमध्ये कोरोना हा एक मोठा आजार बनला आहे. त्यांची लोकसंख्या 142 कोटी आहे. त्यामध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, कॅनडा आणि इतर देशांचा समावेश आहे. 26 मेपर्यंत या देशांमध्ये कोरोनामधून सुमारे 3.43 लाख लोक मृत्युमुखी पडले आहेत. पुढे रविशंकर प्रसाद म्हणाले, भारताची लोकसंख्या 137 कोटी आहे आणि आपल्या देशात 4,345 लोकांचे मृत्यू झाले आहेत. 64 हजारांहून अधिक रुग्णांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.राहुल गांधी देशाचा संकल्प अन् लढा कमकुवत करीत आहेत: प्रसादप्रसाद म्हणाले की, राहुल गांधी 5 मार्गांनी देशाच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याला आणि संकल्पाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 1- नकारात्मकता पसरवणे, 2- संकटाच्या वेळी देशाविरुद्ध काम करणे. 3- चुकीचं श्रेय घेणे,  4- सांगायचं वेगळंच आणि भलतंच काहीतरी करायचं. 5- चुकीच्या गोष्टी आणि खोट्या बातम्या पसरवणे. ' भिलवाडा मॉडेलचंही राहुल गांधींनी खोटारडेपणानं श्रेय घेतल्याचाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. काँग्रेसचे मुख्यमंत्री राहुल गांधींचं म्हणणे ऐकत नाहीत? : भाजपालॉकडाऊनबाबत राहुल गांधींच्या प्रश्नांवर प्रसाद म्हणाले की, कॉंग्रेसशासित राज्यांनी सर्वप्रथम याची घोषणा केली. पंजाबने प्रथम लॉकडाऊन जाहीर केला. मग राजस्थान या राज्यानं लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या अगोदर महाराष्ट्र आणि पंजाबने 31 मेपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ दिली. प्रसाद म्हणाले, 'राहुल गांधी, तुम्ही म्हणता की लॉकडाऊन हा तोडगा नाही, तर मग तुम्ही आपल्या मुख्यमंत्र्यांना हे का स्पष्टपणे  सांगत नाही? की ते तुमचे ऐकत नाहीत की तुमच्या मताचा काही विचार करीत नाहीत?, असा टोलाही प्रसाद यांनी लगावला आहे. 'राहुल जबाबदारीतून पळत काढत आहेत'महाराष्ट्राच्या युती सरकारमध्ये कॉंग्रेसला मोठे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, या राहुल गांधींच्या कालच्या वक्तव्यावरही प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, राहुल गांधी जबाबदा-यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न करीत आहेत. लॉकडाऊनबद्दल राहुल गांधी यांनी खोटे बोलल्याचा आरोप प्रसाद यांनी केला. लॉकडाऊनचा देशाला फायदा झाला, असेही त्यांनी सांगितले. इतर मोठ्या देशांपेक्षा भारतात कमी मृत्यू झाले असतील आणि जास्त रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असल्यास त्याचं श्रेय लॉकडाऊनला जाते, असंही रविशंकर प्रसाद म्हणाले आहेत. 

हेही वाचा

भारत-चीन तणाव वाढला! युद्धाच्या तयारीला वेग द्या; शी जिनपिंग यांचे सेनेला आदेश

बिनकामी माणसंच सरकार पाडण्याचा विचार करू शकतात, पवार फडणवीसांवर भडकले

CoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला 'खास' फोटो; युजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया

लडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर

CoronaVirus News: राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का?; राणेंच्या 'त्या' विधानावर फडणवीस बोलले

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी