शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

CoronaVirus Lockdown News: देशात पुन्हा लॉकडाऊन होणार?; नेमक्या शब्दांत अमित शहांनी बरंच काही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 08:04 IST

CoronaVirus Lockdown News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हं

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.  दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत हा आकडा  २ लाखांवर पोहोचला. यानंतर काल देशात २ लाख ६१ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर गृहमंत्री अमित शहांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे.मोठी बातमी! संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमतकोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतलं. या लाटेकडे दुर्लक्ष करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असं अमित शहा म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर अवलंबून असेल. राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असं शहांनी म्हटलं. 'भारतच नव्हे, अन्य देशांमध्येही कोरोनाची दुसरी लाट जास्त भीषण ठरली. दुसऱ्या लाटेनं जगभरात प्रचंड मोठी हानी झाली. पण इतर देशांची लोकसंख्या आणि तिथे झालेलं नुकसान पाहता भारतानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात चांगली कामगिरी केली आहे,' असं गृहमंत्री म्हणाले. ते 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते."कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’सध्या देशात सर्वत्र ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र देशात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा कोणताही तुटवडा नसल्याचं शहांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले. प्रचारसभांमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत आहे. मोदींच्या सभांमध्ये सर्व नियम पाळले जात असल्याचं शहांनी सांगितलं.बंगालमध्ये २०० जागा जिंकू; शहांना विश्वासपश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष कमीतकमी २०० जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. जय श्रीराम ही घोषणा केवळ धार्मिक नाही. यामधून बंगालच्या जनतेचं दु:ख समोर येतं. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांच्या हितांचं संरक्षण कशाप्रकारे करण्यात येईल, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. हे प्रश्न कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर विचारले जायला हवेत, असं गृहमंत्री म्हणाले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा