शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

VIDEO: महाराष्ट्रातून जाणाऱ्या मजुरांनी रेल्वेतून अन्न फेकलं?; जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 13:50 IST

coronavirus lockdown marathi news परप्रांतीय मजुरांनी रेल्वेतून अन्न बाहेर फेकलं; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

आसनसोल: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे देशभरात अडकलेल्या मजुरांसाठी रेल्वे प्रशासनानं श्रमिक विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परप्रांतीय मजूर त्यांच्या घरी परतू लागले आहेत. अशाच काही परप्रांतीय मजुरांनी त्यांना देण्यात आलेलं अन्न गाडीमधून प्लॅटफॉर्मवर फेकून दिल्याचा प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 'महाराष्ट्रातून घरी परतणारे मजूर मुर्दाबादच्या घोषणा देत आहेत. घरी जायची सोय झाली तर महाराष्ट्राला शिव्या घालायला लागले. या परप्रांतीयांचा माज बघा,' असा मेसेजदेखील व्हिडीओसोबत पसरवला जात आहे.लोकमत डॉट कॉमनं या व्हिडीओची पडताळणी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये हा व्हिडीओ परप्रांतीय मजुरांचा असल्याचं समोर आलं. मात्र हा व्हिडीओ महाराष्ट्रातला नाही. हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधल्या आसनसोल रेल्वे स्थानकातला आहे. रेल्वे स्टेशनवरून निघत असताना मजूर त्यांना देण्यात आलेलं अन्न प्लॅटफॉर्मवर फेकत असल्याचं, मुर्दाबादच्या घोषणा देत असल्याचं यामध्ये दिसत आहे.  सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ ४ मेचा असल्याची माहिती रेल्वेनं दिली. त्या दिवशी स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी श्रमिक विशेष रेल्वे एर्नाकुलमवरुन बिहारमधल्या दानापूरला जात होती. त्यावेळी पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये गाडीला १५ मिनिटांचा थांबा होता. या गाडीत हजारपेक्षा जास्त मजूर होते. आसनसोल स्थानकात ट्रेन थांबल्यावर मजुरांना रेल्वेकडून जेवण आणि पाणी देण्यात आलं. मात्र जेवण निकृष्ट दर्जाचं असल्याची तक्रार अनेक मजुरांनी केली. अन्न शिळं असून त्याला वास येत असल्याचं म्हणत मजुरांनी ते खिडकीतून बाहेर फेकण्यास सुरुवात केली. मजुरांना देण्यात आलेल्या अन्नाला वास येत असल्याच्या काही तक्रारी आल्याची माहिती पूर्व रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एकलब्य चक्रबर्ती यांनी दिली. काही डब्यांमधून अशा प्रकारच्या अडचणी आल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या