शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

CoronaVirus News: देशातील लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता; पण आता बरंच काही बदलणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 09:06 IST

पंतप्रधान मोदींची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; लॉकडाऊनचा घेतला आढावा

नवी दिल्ली: कोरोना संकटातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. देशात लागू असलेला लॉकडाऊनचा तिसरा टप्पा १७ मे रोजी संपणार आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झालेली चर्चा आणि त्या चर्चेचा एकंदर सूर पाहता देशातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. पण हा लॉकडाऊन खूप वेगळा असेल. यामध्ये राज्य सरकारांना अधिकचे अधिकार मिळतील.काल पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना सहा तास मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समस्या आणि लॉकडाऊनबद्दलची मतं मांडली. महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केली. तर अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ रेड झोन आणि कंटेनमेंट झोनमधील निर्बंध वाढवण्याचं मत मांडलं.लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यास आर्थिक व्यवहारांना सवलती मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सध्या लागू असलेले बरेचसे नियम बदलतील. याशिवाय राज्यांचे अधिकार वाढवले जाऊ शकतात. चौथ्या टप्प्यातल्या लॉकडाऊनचे नियम ठरवण्याचा अधिकार राज्यांना मिळू शकतो. या बैठकीत मोदींनी जन ने जग तक ही नवी घोषणा दिली.या बैठकीत पंतप्रधानांनी राज्यांकडे पुढे नेमकं काय करणार याबद्दलचे आराखडे मागितले. लॉकडाऊन उठवण्यासाठी, आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यासाठी आणि ग्रीन-रेड-ऑरेंज झोनशी संबंधित सूचना मोदींनी मागितल्या. झोन निश्चित करण्याचे अधिकार राज्य सरकारांना देण्यात यावेत, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली. लॉकडाऊनशिवाय पुढे जाणं खूप अवघड असल्याचं मत यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मांडलं.आता परिवहन मंत्री अनिल परब यांना सरकार अटक करणार का?; भाजपाचा सवाललॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्राचिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या