शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 17:22 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत.

ठळक मुद्देसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहेमोदी सरकारने यापूर्वी 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होतीपंतप्रधानांनी नागरिक उड्डाण, कामगार आणि ऊर्जा मंत्रालयाशीही शुक्रवारीच बैठक केली होती

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करतानाच लॉकडाउनने प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला फुंकर घालण्यासाठी आता दुसरे प्रोत्साहन पॅकेज जाहीर करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, तसेच वित्त मंत्रालयातील काही बड्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे सूत्रांकडून समजते.

एमएसएमई मंत्रालयाशीही बैठक -सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह आणि निर्मला सीतारमण यांच्याशी बैठक केली आहे. यानंतर ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालय, तसेच वित्त मंत्रालयातील काही मोठ्या अधिकाऱ्यांशीही बैठक करणार आहेत.  आज सायंकाळी देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने अर्थमंत्रालय पंतप्रधानांसमोर एक सविस्तर प्रेझेंटेशनसह आपल्या प्लॅनसंदर्भात माहिती देणार आहे. 

गुंतवणूक आकर्षित करण्यावर चर्चा -पंतप्रधानांनी नागरिक उड्डाण, कामगार आणि ऊर्जा मंत्रालयाशी शुक्रवारीच बैठक केली आहे. अर्थव्यवस्था लवकरात लवकर पट्रीवर आणण्यासाठी स्थानिक तसेच परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी पंतप्रधानांनी यापूर्वीच अर्थ तसेच एमएसएमई मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केली आहे. या बैठकांमध्ये गृहमंत्र्यांबरोबरच अर्थमंत्रीही उपस्थित होते.

यापूर्वी केली होती 1.7 लाख कोटींची घोषणा -लॉकडाउनमुळे प्रभावित झालेल्या गरिबांसाठी मोदी सरकारने यापूर्वी 1.7 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. यात, मोफत धान्य वितरण, घरगुती गॅस वितरण, तसेच गरीब महिला आणि वृद्धांसाठी आर्थिक मदतीचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता सरकार पुन्हा गरिबांसाठी तसेच भारतातील उद्योग धंद्यांसाठी दुसऱ्यांदा मदत म्हणून पॅकेजच्या घोषणेवर विचार करत आहे.

लॉकडाउनमुळे आर्थिक व्यवहार ठप्प -सरकारने पहिल्या टप्प्यात 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा केली होती. यानंतर परत लॉकडाउनची तारीख वाढवून 3 मे करण्यात आली. आता परत दोन आठवड्यांनी लॉकडाउन वाढवून 17 मेपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे दुकाने, कारखाने, रेल्वे तसेच विमानसेवेसह सर्वच प्रकारचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्थाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनAmit Shahअमित शहा