शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : धक्कादायक! सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण, पालकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: एका सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. सोशल डिस्टंसिंग, मास्क, होम क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता अनलॉकमध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता सर्वच राज्यात पाऊल उचललं जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून एका शाळेतील 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील एका सरकारी शाळेतील 26 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसरा, ठाकूरमुंडा, मयूरभंज येथील चमकापूर आदिवासी निवासी मुलींच्या शाळेतील 26 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली आहे. तर उर्वरित 15 विद्यार्थिनींचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बाधित विद्यार्थ्यांना सरकारी शाळेच्या आवारात विलगीकरणात ठेवण्यात आले असून अधिकाऱ्यांकडून सातत्याने संपर्क साधला जात आहे. 

जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर, परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित 

करंजिया उपजिल्हा दंडाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर देखरेख करत आहे. औषधे दिली जात असून रुग्णवाहिका स्टँडबाय ठेवण्यात आल्या आहेत. परिस्थिती आणखी बिघडल्यास आम्ही विद्यार्थ्यांना डीएचएच रुग्णालयात हलवू, असं म्हटलं आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि शाळेचा परिसर दिवसातून दोनदा स्वच्छ केला जात आहे. COVID-19 सुरक्षा प्रोटोकॉलचा भाग म्हणून सर्व विद्यार्थ्यांचे नमुने कोरोना व्हायरस चाचणीसाठी गोळा केले जातील. शाळेमध्ये 20 कर्मचारी सदस्यांसह एकूण 259 विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांमध्ये सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर ते गुरुवारी आजारी पडले. 

कोरोना तपासणीत 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह

शाळा प्रशासनाने आजारी विद्यार्थ्यांची कोविड-19 चाचणी करून घेतली. कोरोना तपासणीत 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चाचणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 26 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. तर इतर 15 विद्यार्थ्यांचे नमुने बारीपाडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हे विद्यार्थी जिल्ह्यातील ठाकुरमुंडा ब्लॉकमधील चमकापूर निवासी हायस्कूलचे रहिवासी आहेत. या पार्श्वभूमीवर करंजियाचे उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी वैद्यकीय पथकासह शनिवारी शाळेला भेट दिली. 'आम्ही शाळेची स्वच्छता केली आहे. सर्व पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना शाळेत वेगळे करण्यात आले असून त्यांना औषधे दिली जात आहेत. डॉक्टरांचे पथक येथे असून आम्ही विद्यार्थ्यांवर बारीक लक्ष ठेवून आहोत, असं उपजिल्हाधिकारी रजनीकांत बिस्वाल यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशाSchoolशाळाStudentविद्यार्थी