शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू, विरह सहन न झाल्याने पतीची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 08:41 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पतीने देखील आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. 

कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पतीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या होशंगाबादमध्ये राहणाऱ्या एका वकिलाच्या पत्नीला कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. मात्र पत्नीच्या मृत्यूचा मोठा मानसिक धक्का बसल्याने वकील नैराश्यात गेले होते. त्यानंतर त्याने गोळी झाडून आत्महत्या केली आहे. आनंद दुबे असं या वकिलाचं नाव असून ते परिसरात अत्यंत लोकप्रिय वकील असल्याचं म्हटलं जातं. 

आपल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आनंद खूप दु:खी झाले होते. कामात देखील त्यांचं लक्ष लागत नव्हतं. त्यामुळे आनंद यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आई-वडिलांचं छत्र हरपल्याने त्यांचा मुलगा आता अनाथ झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याने 6 मुलं अनाथ झाली आहे. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यामध्ये अमाहा गावात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कुटुंबाची वाताहत झाली आहे.

 ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ

कोरोनामुळे घरातील कर्त्या मंडळींचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आधी वडिलांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आईला देखील जीव गमवावा लागला आहे. अवघ्या काही महिन्यांत दोघांचाही मृत्यू झाल्याने सहा मुलं आता पोरकी झाली आहेत. सर्वात मोठी मुलगी ही सात वर्षांची आहे. तर सर्वात लहान चिमुकला अवघा आठ महिन्यांचा आहे. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने मुलीवर मदत मागण्याची वेळ आली आहे. भावंडांचं पोट भरण्यासाठी सात वर्षीय मुलगी गावातील घराघरात जाऊन अन्न मागत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मुलांची आई घर चालवत होती. पण कोरोनाने तिचाही मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले. पण आता नातेवाईकांनी देखील मुलांकडे पाठ फिरवली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूPoliceपोलिस