शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! दिल्लीत कोरोनाचा हाहाकार, स्मशानभूमीत लाकडांची कमतरता; वन विभागाकडे मागितली मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 17:22 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच लाकडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन विभागाकडे यासाठी मदत मागण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल दीड कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अंत्यसंस्कारासाठी देखील रांगा लागल्या आहे. स्मशानभूमीतही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आता स्मशानभूमीत लाकडाची कमतरता भासू लागल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळेच लाकडाचा तुटवडा निर्माण झाला आहे. वन विभागाकडे यासाठी मदत मागण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लाकडांची व्यवस्था करण्यासाठी पालिकेच्या एजन्सींनी राज्य वन विभागाकडे संपर्क साधला आहे. लाकडांची समस्या दूर करण्यासाठी पूर्व दिल्ली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुकलेल्या गोवऱ्यांचा वापर इंधन म्हणून करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाची दुसरी लाट येण्यापूर्वी शहरातील सर्वात मोठी स्मशानभूमी असलेल्या निगमबोध स्मशानभूमीत दररोज  6,000-8,000 किलो लाकडांची आवश्यकता भासत होती. परंतु, दुसऱ्या लाटेदरम्यान ही मागणी प्रत्येक दिवसाला जवळपास 80,000-90,000 किलो लाकडांपर्यंत पोहचली आहे.

उत्तर एमसीडीचे महापौर जय प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मशानभूमी घाटातील लाकडी साठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेला पार्किंग आणि पार्कमध्ये स्मशानभूमीची सुविधा करावी लागेल. त्याचबरोबर लाकडाची गरजही बरीच वाढली आहे, म्हणून दिवसभर लाकडाची मागणी पूर्ण करण्यासाठी दिल्ली सरकारच्या सहकार्याची गरज आहे. शहराच्या वनविभागाने सांगितले की त्या इमारती लाकडांसाठी पालिका यंत्रणांकडून विनंत्या आल्या आहेत. 

उपवनसंरक्षक आदित्य मदनपोत्रा ​​यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी क्षेत्र परिवहन कॉर्पोरेशनला दिल्लीत प्रादेशिक जलद संक्रमण प्रणाली तयार करण्यास परवानगी दिली आहे, जेणेकरून आता कमीतकमी 500 झाडांच्या लाकडाचा वापर होऊ शकेल. त्याचवेळी एसडीएमसीने दिल्ली सरकारला शेजारील राज्यांकडून लाकडाचा पुरवठा शहरात कोणत्याही प्रकारचा अडथळा न येता करता येईल याची काळजी घेण्यास सांगितले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीDeathमृत्यूIndiaभारतforest departmentवनविभाग