शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! 'कोरोना कायमस्वरुपी नसणार, लवकरच याचा अंत होणार'; शास्त्रज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2022 12:58 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली.

नवी दिल्ली - देशात गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी (16 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,71,202 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा साडे चार लाखांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.51 टक्क्यांवर आहे. याच दरम्यान एक मोठा दिलासा मिळाला आहे. 

देशात लसीकरण मोहीम सुरू केली असून आतापर्यंत लाखो लोकांनी लस घेतली आहे. कोरोनाविरोधात लसीकरण हे सर्वात मजबूत शस्त्र असल्याचं वॉशिंग्टनमधील शास्त्रज्ञ डॉ. कुतुब महमूद (Dr Kutub Mahmoood) यांनी म्हटलं आहे. कोणताही साथीचा रोग कायमस्वरुपी नसतो आणि लवकरच कोरोना देखील संपेल, असंही त्यांनी सांगितलं. "कोरोना कायमस्वरूपी राहू शकत नाही आणि तो संपेल. हा एक प्रकारचा खेळ आहे आणि या खेळात कोणीही विजेता नाही, हा ड्रॉ होणार आहे. एक वेळ येईल जेव्हा हा व्हायरस लपून जाईल आणि आपण खरोखरच जिंकू. आपल्याला आपल्या मास्कच्या मागे लपून राहावं लागणार नाही, त्यापासून आपली सुटका होईल. या क्षणाच्या आपण खूप जवळ आलोय, असं मला वाटतं. जसजसे आपण या वर्षात पुढे जाऊ, तस तसं आपण लवकरच महामारीतून बाहेर येऊ" असं डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. 

"आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे"

"कोरोना व्हायरस आपलं स्वरुप सातत्याने बदलत आहे आणि माणसातील बदलत्या प्रतिकारशक्तीशी जुळवून घेण्याचा दबाव असतो आणि मग तो या नवीन प्रकारांना बनवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून ते सुटू शकतील. हा एक बुद्धिबळाच्या खेळासारखा खेळ आहे. व्हायरस आणि माणूस यांच्यात हे एक साधर्म्य आहे. माणसाच्या आणि व्हायरसच्या हालचाली सुरू आहे. आपण बचावासाठी मास्क, हँड सॅनिटायझर्स, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत आहोत. आपल्याकडे लस, अँटीव्हायरल आणि अँटिबॉडिज ही शस्त्रे आहेत, जी आपण कोरोना विरुद्ध वापरली आहेत" असं डॉ. कुतुब यांनी सांगितलं.

"12 महिन्यांत जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य"

"देशासाठी आणि भारतातील लस उत्पादकांसाठी ही खरोखर मोठी उपलब्धी आहे. भारतीय लसी जागतिक स्तरावर वापरल्या जातात. आणि गेल्या वर्षी यावेळी आपण या लसींना भारतीय DCGI मार्फत मंजुरी मिळवण्याच्या प्रक्रियेत होतो. त्यानंतर आपातकालीन वापराची परवानगी मिळाली आणि 12 महिन्यांत आपण जवळपास 60 टक्के लसीकरण साध्य केले आहे. ही भारत सरकार, आरोग्य मंत्रालय आणि लस उत्पादकांसाठी मोठी उपलब्धी आहे,” असं देखील डॉ. कुतुब यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन