CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 16:09 IST2021-04-26T16:05:17+5:302021-04-26T16:09:00+5:30

CoronaVirus: एका विडी कामगाराने आपली ऐपत नसताना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीला दान दिले.

coronavirus kerala beedi worker donated rs 2 lakh to cm relief fund | CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

CoronaVirus: विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी; मुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाख

ठळक मुद्देविडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरीमुख्यमंत्री मदत निधीसाठी दिले २ लाखांचे दानकाय घडले नेमके? पाहा

कुन्नूर: संपूर्ण देशभरात कोरोनाचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनामुळे होणारे मृत्यूंचे प्रमाणही वाढताना दिसत आहेत. अशातच एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. केरळमधील कुन्नूर येथे राहणाऱ्या एका विडी कामगाराने आपली ऐपत नसताना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री आपत्कालीन मदत निधीसाठी २ लाख रुपयांचे दिले आहेत. (coronavirus kerala beedi worker donated rs 2 lakh to cm relief fund)

कुन्नूरमधील एका छोट्याशा गावात राहणाऱ्या या विडी कामगाराची कौतुकास्पद कामगिरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही या गोष्टीची दखल घेतली आणि ट्विटरवरून माहिती दिली. हा विडी कामगार नक्की कोण यासंदर्भातील माहिती उघड करण्यात आलेली नाही, तरीही सर्वत्र त्याचे कौतुक होताना दिसत आहेत.

“हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

काय घडले नेमके?

या विडी कामगाराने बँकेकडे दोन लाख रुपयांचे दान करण्यासंदर्भात माहिती दिली, तेव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला. सुरुवातीला बँकेतील कर्मचारी मुख्यमंत्री मदतनिधीमध्ये पैसे वळवण्यासंदर्भात विचार करत होते. या विडी कामगाराला तुझी आर्थिक परिस्थिती ठीक नसताना एवढी मोठी रक्कम का देत आहे, असे विचारले असता, मी अजूनही विड्या वळून जगण्यासाठी पैसे कमवू शकतो, असे तो म्हणाला. आपण दिव्यांग असल्याने आपल्याला पेन्शनची रक्कम मिळत असल्याचेही या व्यक्तीने सांगितले, अशी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या विडी कामगाराच्या खात्यावर २ लाख ८५० रुपये होते. त्यातील दोन लाख त्याने मदत म्हणून दिले. त्याच्या खात्यावर केवळ ८५० रुपये शिल्लक राहिल्याचे सांगितले जात आहे. 

चर्चा खूप झाल्या, देशवासीयांना लस मोफत मिळायला हवी; राहुल गांधींची मागणी

मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून केले कौतुक

मुख्यमंत्री आपत्कालीन निधीसाठी मदत करणाऱ्यांच्या अनेक कथा समोर येत आहेत. खात्यावर २ लाख ८५० रुपये असताना त्यापैकी दोन लाख रुपये मदतनिधीला देणाऱ्या वयस्कर व्यक्तीची गोष्ट समोर आली आहे. हे आपले एकमेकांबद्दल असणारे प्रेमच आपल्याला इतरांहून वेगळे बनवते. पुन्हा एकदा सर्वांचे आभार, असे मुख्यमंत्री विजयन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

लॉकडाऊन करा; कुंभमेळ्यातील तिसऱ्या शाहीस्नानाबाबत मागणी, आखाड्यांची मात्र तयारी

दरम्यान, केरळसमोर लसीकरणाचे आव्हान आहे. कुन्नुरमधील विडी कामागाराने दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दान करत स्वत:च्या खात्यावर केवळ ८५० रुपये ठेवलेत. बँकेच्या कर्मचाऱ्यांना हे पैसे वळवून घेण्यासंदर्भात शंका होती. मात्र या कामगाराने मी विड्या वळून पोटापाण्यासाठी कमाई करू शकतो. तसेच मला दिव्यांग पेन्शन मिळते असे सांगितले. लोकांनी दाखवलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही ऋणी आहोत, असे ट्विट केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी केले.
 

Web Title: coronavirus kerala beedi worker donated rs 2 lakh to cm relief fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.