शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : IPS अधिकारी बनला देवदूत, मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले 78 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 15:51 IST

रुग्णालय प्रशासनाच्या एका ट्विटनंतर, समोर आले ओडिशात तैनात असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा... (IPS Arun Bothra)

नवी दिल्ली - देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस कोरोना संकट वाढतच चाले आहे. अशात रुग्णांना सर्वाधिक गरज भासतेय ती ऑक्सिजनची. मागणी वाढल्याने देशभरातील रुग्णालयांत ऑक्सिजनचाही तुडवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णालय प्रशासन शक्य त्या ठिकाणी ऑक्सिजनची मागणी करत आहे. नुकतीच दिल्लीतील राठी रुग्णालयातही अशीच परिस्थिती बघायला मिळाली. या रुग्णालयांत केवळ एक तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक होता. अशा परिस्थितीत एका आयपीएस अधिकाऱ्याने या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली. या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे अरुण बोथरा. (CoronaVirus IPS Arun Bothra arranges oxygen cylinders for 78 patients in delhi Rathi  Hospital)

रुग्णालयाच्या विनंतीवर समोर आले आयपीएस -    सर्व प्रयत्न केल्यानंतर अखेर रुग्णालय प्रशासनाने अरविंद केजरीवाल, आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि पंतप्रधान यांना मेंशन करत एक ट्विट केले, की आमच्या रुग्णालयाला ऑक्सीजन सप्लाय होत नाहीय. यामुळे दाखल 78 रुग्णांच्या उपचारात अडथळा येत आहे. आम्ही सकाळपासूनच कॉल करत आहोत, मात्र, कुठल्याही हेल्पलाइन नंबरवर आमच्या कॉलला उत्तर मिळत नाही. आम्ही फोन करत आहोत, पण ते फोन कट करत आहेत. कृपया ही पोस्ट अधिकाधिक शेअर करा.'  

Corona Vaccine : कोरोना लस घेतल्यानंतर महिलेच्या अंगावर आले रक्ताचे फोड, पाय कापावा लागण्याची सतावतेय भीती

रुग्णालय प्रशासनाच्या ट्विटनंतर, ओडिशात तैनात असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा मदतीसाठी समोर आले. रुग्णालयाच्या ट्विटला कोट करत त्यांनी लिहिले, ‘पुन्हा एकदा राठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. रात्री 2 वाजेपर्यंत त्यांच्याकडे केवळ 1 तासांचाच ऑक्सीजन शिल्लक आहे. 68 रुग्णांचा जीव धोक्यात आहे. यावेळी कुणी मदत करू शकते का? कृपया हे पुढे पाठवा आणि आपण जशी शक्य आहे तशी मदत करा.’

CoronaVaccine : "अदर पूनावाला, तुम्ही तर दरोडेखोरांपेक्षाही वाईट..."; भाजप आमदाराचा संताप, म्हणाले...

अरुण बोथरा यांच्या ट्विटनंतर अनेक लोक मदतीसाठी समोर आले. त्यांच्या ट्विटनंतर, या प्रकरणाची सर्वप्रथम दखल घेतली, ती  वरिष्ठ आयएएस अधिकारी आणि गृह मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या संजीव गुप्ता यांनी. यानंतर गुप्ता यांनी  गृह मंत्रालयाच्या कंट्रोल रूमला अलर्ट केले. यासंदर्भात मुंडका आणि रनहोलाच्या एसएचओंसोबत चर्चा झाली. यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनंतर रुग्णालयासाठी 24 टाइप-डी ऑक्सिजन सिलेंडर आणि 14 टनांच्या एका ऑक्सीजन ट्रकची व्यवस्था झाली.

ऑक्सिजनची व्यवस्था झाल्यानंतर राठी रुग्णालय प्रशासनाने आयपीएस अरुण बोथरा यांचे आभार मानत, गेल्या 6 तासांपासून अडकलेले आमचे ऑक्सीजन सिलेंडर रिलीझ करण्यासाठी मदद केल्याबद्दल आभार अरुण सर, असे ट्विट केले आहे.

CoronaVirus : शरीरातील ऑक्सीजन स्तर कमी होऊ लागला, तर करा 'हा' उपाय; आरोग्य मंत्रालयानं दिलीय माहिती

नेहमीच गरजूंच्या मदतीसाठी धावून जातात आयपीएस अरुण -  अरुण बोथरा हे 1996 बॅचचे ओडिशा कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते नेहमीच गरजूंना मदत करत असतात. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्येही त्यांनी स्वतः प्रयत्न करून एका तरुणाचा जीव वाचवला होता. तेव्हा, एका महिलेने पंतप्रधान मोदींना टॅग करत मुलासाठी सांडणीच्या दूधाची मागणी केली होती. या महिलेच्या मुलाला ऑटिझमचा आजार होता. अशा वेळी मुलांना सांडणीचे दूध दिले जाते. मात्र, लॉकडाउनमुळे दुधाची व्यवस्था करता येणे अवघड होते. दूध मिळत नसल्याने मुलाची प्रकृती बिघडत चालली होती. ही गोष्ट जेव्हा अरुण बोथरा यांना समजली, तेव्हा त्यानी राजस्थानात सांडणीच्या 20 लिटर दुधाची व्यवस्था केली होती. यानंतर हे दूध रेल्वेच्या सहाय्याने मुंबईला संबंधित मुलाच्या आईपर्यंत पोहोचविण्यात आले. 

याच प्रकारे यापूर्वी, अरूण यांनी एका 12 वर्षांच्या मुलाचीही त्याच्या आई-वडिलांशी भेट घालून दिली होती. हा मुलगा दिल्लीतील द्वारका भाकातील एका पार्कमध्ये आढळून आला होता. 

कोरोना काळात अचानक पैशांची गरज पडली तर! जाणून घ्या, कुठून होऊ शकते तत्काळ व्यवस्था?

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरdelhiदिल्ली