शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

coronavirus: भारतात ऑक्सिजनचे मागणीपेक्षा उत्पादन अधिक, तरीही निर्माण झालीय टंचाई, समोर आले धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 08:58 IST

Oxygen shortage in India : देशात ऑक्सिजनचे उत्पादन हे मागणीपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र तरीही निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. 

ठळक मुद्देदेशातील ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन मागणीपेक्षा अधिक आहे१२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात दैनंदिन उत्पादन क्षमता ७ हजार २८७ मेट्रिक टन एवढी आहे. तर दैनंदिन मागणी ३ हजार ८४२ मेट्रिक टन एवढी आहेदेशामध्ये सध्या मेडिकल आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा सध्याचा साठा हा ५० हजार मेट्रिक टन एवढा आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्णवाढ होत असल्याने उपचारांसाठी आवश्यक साधनसामुग्रीची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झालेली आहे. (coronavirus in India) त्यात कोरोनामुळे प्रकृती गंभीर बनलेल्या श्वसनास त्रास होत असलेल्या रुग्णांना आवश्यक असलेल्या ऑक्सिजनचीही टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. (Oxygen shortage in India ) बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजनसाठी धावपळ करावी लागत आहे. दरम्यान, देशात ऑक्सिजनचे उत्पादन हे मागणीपेक्षा अधिक असल्याचे समोर येत आहे. मात्र तरीही निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या टंचाईमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. (India's production exceeds demand for oxygen, yet created scarcity, shocking reason )

केंद्र सरकारने रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्यासाठी उद्योगांना ऑक्सिजन पुरवण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे आता केवळ ९ अत्यावश्यक उद्योगांनाच ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. रिलायन्स, टाटा स्टील, सेल, जिंदाल स्टिल यांनी कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू केला आहे. इफको या खत बनवणाऱ्या सहकारी संस्थेने ऑक्सिजन प्लँटची उभारणी सुरू केली आहे. येथून रुग्णालयांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. तसेच मागणीची पूर्तता करण्यासाठी  ५० हजार मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजनची आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

कोरोनाकाळापूर्वी देशात लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची दररोज सरासरी ७०० मेट्रिक टन एवढी मागणी होती. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये ही मागणी २८०० मेट्रिक टन प्रतिदिन एवढी झाली. दरम्यान दुसऱ्या लाटेमध्ये ही मागणी ५००० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे. 

देशातील ऑक्सिजनचे दैनंदिन उत्पादन मागणीपेक्षा अधिक आहे. १२ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात दैनंदिन उत्पादन क्षमता ७ हजार २८७ मेट्रिक टन एवढी आहे. तर दैनंदिन मागणी ३ हजार ८४२ मेट्रिक टन एवढी आहे. मागणी ५००० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली तरी ती उत्पादन क्षमतेपेक्षा कमी आहे. 

देशामध्ये सध्या मेडिकल आणि इंडस्ट्रियल ऑक्सिजनचा सध्याचा साठा हा ५० हजार मेट्रिक टन एवढा आहे. इंडस्ट्रियल ऑक्सिजनला मेडिकल ग्रेडमध्ये परिवर्तित करण्यासाठी तो ९३ टक्के शुद्ध करावा लागतो. मात्र त्यामधील खरी समस्या ही ऑक्सिजनला संबंधित रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्याची आहे. 

सध्या देशामध्ये लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी क्रायोजेनिक टँकर पुरेशा संख्येमध्ये उपलब्ध नाही आहेत. संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. तसेच एकाचवेळी अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. सध्या देशात सिलेंडर आणि त्यासोबत वापरण्यात येणाऱ्या उपकरणांची टंचाई आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन मिळत नाही आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य