शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

CoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 3:59 AM

केंद्रीय समितीची आज बैठक; लसीबाबतच्या घडामोडींवर भारताचे लक्ष

नवी दिल्ली : अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाला रोखण्याची आशा रशियन लसीने पल्लवित केली असली तरी भारतीयांना मात्र त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला परदेशी लस स्वदेशात आणण्यासंबंधी निर्णयाचे अधिकार असतात व याच समितीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. रशियन लसीचा थेट उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले. मात्र, देशांतर्गत व देशाबाहेर लस तयार करणाºया सर्व कार्यक्रमांवर भारताचे लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नीती आयोगाचे सदस्य वी.के. पॉल या समितीचे सदस्य आहेत. भारतात लस विकसित, वितरित करण्याचे सर्व अधिकार याच समितीला आहेत. भारतीयांसाठी कोणती लस निवडावी, लसीकरण कार्यक्रम कधी जाहीर करावा, लस कुणाला द्यावी, त्यासाठी लागणारी वैद्यकीय पायाभूत सुविधा कशा व कुठे उभाराव्यात तसेच किती निधी खर्च करायचा असे महत्त्वाचे अधिकार या समितीला असल्याचे राजेश भूषण यांनी नमूद केले. रशियाने कोरोनावर लस विकसित केल्याची घोषणा करताच जगभरात वेगवेगळी प्रतिक्रिया उमटली.ऑक्सफर्डच्या मदतीने भारतातही लस तयार केली जात आहे. त्याची माहिती देताना राजेश भूषण यांनी कालमर्यादेचा उल्लेख करणे टाळले. लसीकरण विकास कार्यक्रम समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक आहे, यावरच राजेश भूषण यांनी भर दिला.दरम्यान, आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही लस स्वीकारणे, तसा कार्यक्रम भारतात राबवणे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे रशियन लसीवर भारत प्रतिक्रिया देणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे मतही महत्त्वाचे ठरेल. मात्र, भारतातही कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे काही महिन्यांत भारतीय लस तयार होण्याची शक्यता नाही.जागतिक आरोग्य संघटना रशियाच्या संपर्कातजागतिक आरोग्य संघटनेने मात्र अद्याप रशियन लस मान्य अथवा अमान्य केली नाही. आम्ही रशियन आरोग्य व्यवस्थापनाच्या संपर्कात आहोत, त्यांच्याकडून पुरेशी आकडेवारी मिळाली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते, तर रशियन प्रसारमाध्यमांच्या मते विकसित केलेल्या सर्वांना डोस देण्यात आला असून, ताप वगळता इतर कोणतीही लक्षणे त्यांच्यात नसल्याने लस सुरक्षेची ग्वाही देते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या