Coronavirus: भारतात लवकरच दररोज एक लाख कोरोना टेस्ट होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:37 IST2020-05-03T00:37:14+5:302020-05-03T00:37:26+5:30
आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, भारत लवकरच जगातील त्या पाच देशांच्या रांगेत जाऊन बसेल जे देश दररोज एक लाख टेस्ट करतात.

Coronavirus: भारतात लवकरच दररोज एक लाख कोरोना टेस्ट होणार
नवी दिल्ली : भारतात लवकरच दररोज एक लाख कोरोना टेस्ट होणार आहेत. देशात शनिवारी टेस्टची संख्या दुप्पट म्हणजे ७३,७०९ करण्यात आली आहे. देशाची टेस्टची क्षमता ५० हजार टेस्ट होती. आता ती दररोज एक लाख इतकी होणार आहे.
देशातील ३०४ सरकारी आणि १०५ खासगी लॅबच्या माध्यमातून १० लाख टेस्टचा टप्पा गाठण्यात आला आहे. गुजरातमध्ये सध्या तपासाचा वेग दहा लाख लोकांमागे ११४० इतकाच आहे. तर, महाराष्ट्रात हा दर दहा लाखांमागे १३६३ आहे. या यादीत दिल्ली वरच्या क्रमांकावर आहे. येथे दहा लाखांमागे २३७० टेस्ट होत आहेत.
आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, भारत लवकरच जगातील त्या पाच देशांच्या रांगेत जाऊन बसेल जे देश दररोज एक लाख टेस्ट करतात. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, आगामी दहा दिवसात टेस्ट वाढविण्यासाठी संबंधित उत्पादन वाढविण्यात येत आहे. या टेस्ट आरटी- पीसीआर कीटच्या माध्यमातून केल्या जात आहेत. आयसीएमआर याला ‘गोल्डन टेस्ट’ म्हणते. कारण, या टेस्ट १०० टक्के अचूक असतात.
ऑरेंज झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासाला मिळाली परवानगी
1 नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर ऑरेंज झोनसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुधारित मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. ऑरेंज झोनमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी खासगी चारचाकी व दुचाकी वापरता येईल. मात्र, स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या कामांसाठीच हा प्रवास करता येईल.
2 ऑरेंज झोनमध्ये कॅब, ओला, उबरसाठीदेखील हा नियम लागू असेल. मात्र, चारचाकीत चालकासह दोन, तर दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकेल.
3 आंतरजिल्हा प्रवासामुळे दोन तालुक्यांमधील अर्थकारणास गती येईल. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावण्यास पर्याय नसेल. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असून, स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. आॅरेंज झोनसाठी मार्गदर्शिकेतील स्पष्टीकरण माहिती व प्रसार मंत्रालयाने शनिवारी दिले.