शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
"तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

CoronaVirus: आजचा दिवस खूप वाईट! एकूण मृतांचा आकडा दोन लाख पार; सर्वाधिक रुग्ण, मृत्यूची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:38 AM

total death toll reached 2,01,187 cases in India: देशात कोरोनाच्या लाटेने (CoronaVirus Second Wave) किती भयानक आणि भयावह रुप धारण केले आहे याचा प्रत्यय आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून येत आहे.

देशात कोरोनाच्या लाटेने (CoronaVirus Second Wave) किती भयानक आणि भयावह रुप धारण केले आहे याचा प्रत्यय आज जाहीर झालेल्या आकडेवारीवरून येत आहे. देशात दर दिवशी सकाळी कोरोनाबाधितांची (Corona Patient) आकडेवारी जाहीर केली जाते. दरदिवशीच्या आकडेवारीमध्ये आज सर्वाधिक वाढ झाली आहे. तसेच दरदिवशीच्या मृतांचा आकडाही आज सर्वाधिक नोंदविला गेला आहे. (India reports 3,60,960 new #COVID19 cases, 3293 deaths and 2,61,162 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)

देशात गेल्या 24 तासांत 3,60,960 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 3293 मृत झाले आहेत. मृतांचा हा आकडा आजवरचा सर्वाधिक आहे. गेल्या २४ तासांत देशात 2,61,162 रुग्ण बरे झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एकूण बळींच्या आकड्याने दोन लाखांचा टप्पा पार केला असून हा आकडा 2,01,187 झाला आहे. देशात सध्या 29,78,709  उपचार घेत असून 1,79,97,267 एकूण कोरोनाबाधित सापडले आहेत. देशात आजवर 14,78,27,367 लसीकरण झाले आहे. 

काल कमी झालेली रुग्णसंख्यादेशात मंगळवारी 3,23,144 नवे रुग्ण सापडले होते. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला होता. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले होते. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले होते. 

१८ ते २५ एप्रिलमध्ये देशात २२ लाख नवे रुग्णदेशात १८ ते २५ एप्रिल या काळात २२ लाख ४९ हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे १६ हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही १.१३ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२.६ टक्के आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस