शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

CoronaVirus: "...तर आज देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख असता"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 06:53 IST

देशातील रुग्ण दुपटीचा कालावधी १० दिवसांवर; लॉकडाउनमुळे संसर्ग न वाढल्याचा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

नवी दिल्ली : वेळेत लॉकडाउन केले नसते तर देशात आतापर्यंत १ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती. परंतु वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे तूर्त कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू न देण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत, अशी भावना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे. सकारात्मक बाब म्हणजे रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी सरासरी १० दिवसांवर आल्याने कोरोनाविरोधातील लढाईस मोठे बळ मिळाले आहे. देशात लागू केलेल्या लॉकडाउनला एक महिना पूर्ण होत असतानाच ही बाब पुढे आली आहे.रुग्ण दुप्पट होण्याचा चार दिवसांपूर्वी हा दर ७ दिवस होता. २१ मार्च रोजी ३ दिवसांमध्ये रुग्ण दुप्पट होत होते. पुढच्या तीनच दिवसांत (२३ मार्च) दुप्पट होण्याचा वेग ५ दिवसांवर आला होता. जनता कर्फ्यू त्यादरम्यान झाला होता, असे निती आयोगाचे सदस्य डा. वी. के. पॉल यांनी आवर्जून नमूद केले. मधल्या काळात मात्र दुप्पट होण्याचा कालावधी कमी झाला होता. पॉल म्हणाले की, अनेक जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होण्यावर नियंत्रण आले आहे. आज दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ९ दिवस आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण सापडण्याचा वेग वाढला आहे.८० जिल्ह्यांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाहीगेल्या १४ दिवसांमध्ये एकही नवा रुग्ण न आढळणाऱ्या जिल्ह्यांची सख्या ८० वर गेल्याने आरोग्य यंत्रणांना मोठा दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेगही १० वर आला असल्याने लॅकडाउन यशस्वी होताना दिसत आहे. तीन राज्यांमध्ये ४ आंतरमंत्रालय अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आले आहे. हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद व सूरतमध्ये केंद्रीय पथक पाठवण्यात आले आहे.२४ तासांत १६८४ रुग्ण; एकूण बाधित २४,४४७गेल्या २४ तासांत (गुरुवार) १६८४ नवे रुग्ण देशभरात आढळले. रुग्णसंख्या २४ हजार ४४७ वर गेली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. आतापर्यंत ४७४८ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण २०.५७ टक्क्यांवर गेले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या