CoronaVirus News: कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या घरात; पण 'त्या' आकड्यानं देशाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 10:40 PM2020-05-19T22:40:39+5:302020-05-19T22:42:47+5:30

CoronaVirus News: प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली

CoronaVirus india records 02 COVID 19 deaths per lakh population says health ministry kkg | CoronaVirus News: कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या घरात; पण 'त्या' आकड्यानं देशाला मोठा दिलासा

CoronaVirus News: कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या घरात; पण 'त्या' आकड्यानं देशाला मोठा दिलासा

Next

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या ६४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १०० वरुन १ लाखांवर पोहोचली आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर अतिशय कमी आहे. देशात दर एक लाख लोकसंख्येमागील मृत्यूदर ०.२ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. जगाची सरासरी काढल्यास हाच आकडा ४.१ इतका आहे. देशात आतापर्यंत १ लाख १ हजार १३९ जणांचा कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ३ हजार १६३ इतका आहे.

सोमवारी (काल) देशात १ लाख ८ हजार २३३ कोरोना चाचण्या झाल्या. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. मंगळवारपर्यंत जगभरात कोरोनामुळे ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयानं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं दिली. जगभरातला मृत्यूदर एक लाख लोकसंख्यामागे ४.१ टक्के असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक ८७ हजार १८० जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत दर एक लाख व्यक्तींमागे मृत्यूदर २६.६ इतका आहे. ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा ३४ हजार ६३६ इतका आहे. ब्रिटनमध्ये दर एक लाख व्यक्तींमागे मृत्यूदर ५२.१ आहे. इटलीमध्ये ३१ हजार ९०८ जणांनी जीव गमावला असून मृत्यूदर ५२.८ इतका आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे २८ हजार ५९ जणांचे प्राण गेले असून मृत्यूदर प्रति लाख व्यक्तींमागे ४१.९ इतका आहे. स्पेन, जर्मनी, इराण, कॅनडा, नेदरलँड, मेक्सिकोमध्ये मृत्यूदर अनुक्रमे ५९.२, ९.६, ८.५, १५.४, ३३.० आणि ४.० इतका आहे. तर चीनमधला मृत्यूदर ०.३ इतका आहे. 

१ जूनपासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा 

काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआर

अखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

Web Title: CoronaVirus india records 02 COVID 19 deaths per lakh population says health ministry kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.