शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

Coronavirus:कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल दुसऱ्यांदा चौकशी हवी, भारताची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 6:43 AM

Coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. 

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने दुसऱ्यांदा चौकशी करावी, असे अमेरिकेने शुक्रवारी म्हटले होते. अशी चौकशी होणे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, असे सांगत भारताने त्या गोष्टीला पाठिंबा दर्शविला आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचा उगम नेमका कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चौकशी सुरू केली होती. त्याच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक सखोल पाहणी करून ठोस निष्कर्ष काढले जाण्याची आवश्यकता आहे.जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केलेल्या चौकशीला सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. त्यामुळे कोरोना साथीच्या उगमाबद्दल नीट माहिती मिळण्यास मदत होईल. कोरोनाचा उगम शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वुहानला जानेवारी महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे पथक पाठविले होते. तिथे तज्ज्ञांचे पथक सुमारे महिनाभर राहिले. कोरोनाचा विषाणू वटवाघळातून एखाद्या वेगळ्या प्राण्याद्वारे माणसांमध्ये संक्रमित झाला असावा, असे मत चिनी शास्त्रज्ञांनी मार्चमध्ये व्यक्त केले होते.  वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोना विषाणू हवेत मिसळला गेल्याची शक्यता चिनी शास्त्रज्ञांनी फेटाळून लावली होती. 

जागतिक आरोग्य संघटनेबद्दल नाराजीकोरोना विषाणू वटवाघळांतून संक्रमित झाला असावा ही एक शक्यता आहे तर या विषाणूची निर्मिती वुहानच्या प्रयोगशाळेत झाली असावी अशी दुसरी शक्यता व्यक्त केली जाते. कोरोना विषाणूच्या उगमस्थानाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने आजवर केलेली चौकशी अपुरी व असमाधानकारक आहे. आता या विषयाची दुसऱ्यांदा चौकशी अत्यंत पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे, असे अमेरिकेने म्हटले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय