शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 09:54 IST

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात संक्रमित लोक सहभागी झाल्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याचे बोलले जात आहे. देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटली आहे. यापार्श्वभूमीवर सोमवारी देशाच्या वेगवेगळ्या भागांत जमातमधील लोकांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 25 हजार 500 लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. सोमवारी राज्यात १२० नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ८६८ वर पोहचली आहे. तसेच  मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.

देशात गेल्या २४ तासात ३५४ नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४४२१ वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यु झालेल्यांचा आकडा ११४ वर पोहोचला आहे. देशातील ४४२१ कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी ३९८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३२५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. 

दरम्यान, भारतात काही ठिकाणी कोरोना व्हायरस तिसऱ्या टप्प्यात पोहोचला असल्याची चिंताजनक माहिती एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली. 'जगाच्या तुलनेत आपल्या देशातली परिस्थिती बरी असली, तरी काही भागात वाढलेली कोरोनाग्रस्तांची संख्या चिंता वाढवणारी असल्याचे गुलेरिया यांनी 'आज तक' या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारतMumbaiमुंबईAIIMS hospitalएम्स रुग्णालय