शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus : सोशल डिस्टंस वाढवा, इमोशनल डिस्टंस घटवा!  मोदींचे भावनिक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 1:07 PM

लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्स वाढवण्याचे आणि इमोशनल डिस्टन्स कमी करण्याचे भावनिक आवाहन मोदींनी देशवासियांना केले आहे. 

ठळक मुद्देसोशल डिस्टंस वाढवा, इमोशनल डिस्टंस घटवा! देशासमोर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला कोरोनाची लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या

नवी दिल्ली - देशावर आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी देशवासीयांची माफी मागितली. मात्र देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, लॉकडाऊनदरम्यान सोशल डिस्टन्स वाढवण्याचे आणि इमोशनल डिस्टन्स कमी करण्याचे भावनिक आवाहन मोदींनी देशवासियांना केले. मन की बात दरम्यान मोदी म्हणाले की, ''मी तुम्हाला सोशल डिस्टन्स वाढवण्याचा सल्ला दिला आहे. मात्र या काळात तुम्ही इमोशनल डिस्टन्स घटवू शकता. तुम्ही आपले सगेसोयरे, जुने मित्र, तसेच अन्य परिचितांशी बोलू शकता.'' तसेच होम कॉरेंटाईन असलेल्या लोकांसोबत काही जण गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे. असे करणे चुकीचे आहे. अशा लोकांसोबत आपण संवेदनशीलतेने वागले पाहिजे, असेही मोदींनी सांगितले. 

मन की बात च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''आज देश आणि संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. आपल्या देशासमोर आलेल्या संकटामुळे मला लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या कठोर निर्णयासाठी मला माफ करा. मी सर्वांना घरात कोंडून ठेवले आहे. पण कोरोनापासून वाचण्यासाठी इतर कुठला पर्याय नव्हता.''

कोरोनापासून बाचावासाठी सर्व मानवजातीला संकल्प करावा लागणार आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पुढच्या अनेक दिवसांपर्यंत पालन करावे लागणार आहे. तसेच काही लोक लॉकडाऊनचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. मात्र लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही. इतर काही देशांनी याचा अनुभव घेतला आहे. कोरोनाची लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या असे आवाहन मोदींनी केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारत