शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

coronavirus: "मास्क वापरायचा कंटाळा आला तर त्या डॉक्टर, नर्सचं स्मरण करा" मोदींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 12:50 PM

मन की बातच्या माध्यमातून मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला.

ठळक मुद्देआपल्या देशाचा रिकव्हरी रेट अन्य देशांच्या तुलनेत चांगला तुम्हाला मास्क काढून ठेवावा असं वाटू लागलं तर एका क्षणासाठी त्या डॉक्टरांचं, नर्सचं स्मरण करा त्या कोरोनायोद्ध्यांची आठवण काढा जे दिवसभर मास्क वापरून अव्यहतपणे रुग्णसेवा करत आहेत

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी देशात कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईची सद्यस्थिती मांडली. तसेच कोरोनाविरोधात लढताना घ्यावयाच्या खबरदारीविषयीही देशवासियांना सल्ला दिला.

देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, आज आपल्या देशाचा रिकव्हरी रेट अन्य देशांच्या तुलनेत चांगला आहे. त्याबरोबरच आपल्या देशात कोरोनामुळे होणार मृत्यूदरसुद्धा अन्य देशांपेक्षा कमी आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र अनेकांना मास्क वापताना त्रास होतो. जर तुम्हाला मास्क परिधान करायला त्रास होऊ लागला, मास्क काढून ठेवावा असं वाटू लागलं तर एका क्षणासाठी त्या डॉक्टरांचं, नर्सचं स्मरण करा. आपल्या त्या कोरोनायोद्ध्यांची आठवण काढा जे दिवसभर मास्क वापरून अव्यहतपणे रुग्णसेवा करत आहेत.’’

एकीकडे आपल्याला कोरोनाविरोधातील लढाई अधिक जागरुकतेने आणि सतर्कपणे लढण्याची गरज आहे. तर दुसरीकडे कठोर मेहनत करून व्यवसाय, नोकरी, शिक्षण, यामध्ये गती आणावी लागेल. त्याला एका विशिष्ट्य उंचीवर न्यावे लागेल, असा सल्लाही मोदींनी दिला.

दरम्यान, दरम्यान, आज मन की बात च्या ६७ व्या भागात देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील योद्ध्यांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बातमध्ये म्हणाले की, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट प्रभाव पडत असतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे.

 कधी कधी आम्ही एखादी गोष्ट समजून घेतल्याशिवाय सोशल मीडियावर अशा गोष्टी शेअर करतो ज्यामुळे आपल्या देशाचे खूप नुकसान होते. कधीकधी ही बाब चुकीची आहे हे माहिती असूनही केवळ कुतुहल म्हणून फॉरवर्ड केले जातात, अशी नाराजीही मोदींनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी