शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: रुग्णालयाने कोरोनाबाधिताला कॅशलेस विमा क्लेम नाकारल्यास इथे करता येणार तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2021 16:38 IST

coronavirus in India : काही रुग्णालयांमध्ये पात्र विमाधारकांना कॅशलेस क्लेमची सुविधा मिळते.  दरम्यान, कोरोना रुग्णाला कॅशलेस विमा क्लेम नाकारल्यास संबंधित रुग्णालयाची तक्रार करण्याची तरतुदही आहे. 

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या प्रचंड प्रमाणात झालेल्या संसर्गामुळे देशभरात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. (coronavirus in India) त्यामुळे रुग्णांवरील उपचारांसाठी होणाऱ्या खर्चावेळी विमा हा महत्त्वपूर्ण ठरत आहे. सर्वात आधी तुम्ही कुठल्या रुग्णालयामध्ये कॅशलेस विमान मिळतो त्याची माहिती घेतली पाहिजे. (cashless insurance claim) आरोग्य विमान देणाऱ्या सर्व विमा कंपन्या रुग्णालयांसोबत एक करार करतात. ज्या रुग्णालयांसोबत हा करार झालेला असतो ते रुग्णालय विमा कंपनीच्या हॉस्पिटलच्या नेटवर्कचा भाग असतात. या रुग्णालयांमध्ये पात्र विमाधारकांना कॅशलेस क्लेमची सुविधा मिळते.  दरम्यान, कोरोना रुग्णाला कॅशलेस विमा क्लेम नाकारल्यास संबंधित रुग्णालयाची तक्रार करण्याची तरतुदही आहे. 

विमा कंपन्यांच्या नेटवर्कमधील रुग्णालयामध्ये दाखल झाल्यावर ग्राहकांना थोड्या सवलतीच्या किमतीत उपचार मिळतात. ही बात तुमच्या विम्यामध्ये कुठल्या कुठल्या खर्चांना कव्हर करण्यात आले आहे त्यावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत कॅशलेस क्लेमदरम्यान, कुठल्याही रुग्णालाा रुग्णालयात भरती करण्याच्या स्थितीत केवळ त्याच खर्चांचा भार उचलावा लागतो जे त्यांच्या विम्यामध्ये समाविष्ट नसतात. रजिस्ट्रेशन खर्च, डिस्चार्ज आणि अॅम्ब्युलन्स यांचा खर्च रुग्णाल स्वत:च्या खिशातून करावा लागतो.  जर तुमच्याकडे आरोग्य विमा आहे. मात्र तुम्ही उपचार घेत असलेले रुग्णालय विमा कंपनीच्या नेटवर्कचा भाग नसेल किंवा तुमची पॉलिसी नॉन कॅशलेस क्लेम पॉलिसी असेल तर तुम्ही विम्यासाठी नंतर क्लेम करू शकता. मात्र त्याची प्रक्रिया ही कॅशलेस क्लेमपेक्षा थोडी क्लिष्ट असते. तसेच त्यासाठी तुम्हाला विमा कंपनीच्या गरजेनुसार बिल जमा करावे लागते. 

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, काही रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांना कॅशलेस क्लेम देण्यास नकार दिल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. त्यानंतर वित्तमंत्री निर्मला सितारामन यांनी याची दखल घेतली  असून, मी आयआरडीएआयच्या चेअरमन यांना विमा कंपन्या आणि नेटवर्क हॉस्पिटलला सूचना करण्याचे आदेश दिले आहे, असे सांगितले. दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या सूचनेनंतर आयआरडीएआयने सर्व नेटवर्क हॉस्पिटल्सनी कोरोना रुग्णांना उपचारांसाठी कॅशलेस ट्रिटमेंट उपलब्ध करावी, असे सक्त आदेश दिले आहे. 

दरम्यान, वित्तमंत्री आणि आयआरडीएआयच्या आदेशांनंतरही जर नेटवर्क हॉस्पिटल्स कॅशलेस उपचार उपलब्ध करून देण्यास नकार देत असतील तर ग्राहक संबंधित विमा कंपनीकडे तक्रार करू शकतात, असे आयआरडीएआयने सांगितले आहे. तसेच यासाठी आयआरडीएआयच्या तक्रार निवारण अधिकाऱ्यांचीही मदत घेता येणार आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल