शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं, पत्नीने घरीच केले उपचार अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2020 08:46 IST

Coronavirus : देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. देशातही वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत 1334 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 27 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 15712 लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आहे. तर 507 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने ही चिंतेची बाब आहे. याच दरम्यान वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.

कोरोनाची लक्षणे असलेल्या पतीला 4 रुग्णालयांनी नाकारलं म्हणून पत्नीने घरीच त्याच्यावर उपचार केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्येडॉक्टर महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. डॉक्टर महिलेला पतीमध्ये कोरोनाची काही लक्षणे दिसली. म्हणून ती त्याला घेऊन रुग्णालयात गेली. मात्र चार रुग्णालयांनी पतीला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर पत्नीने घरीच पतीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि योग्य ते उपचार सुरू केले. पतीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याआधीच तो घरीच उपचार करून ठीकही झाला होता. मात्र टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, नयापुरामध्ये राहणाऱ्या अमन सय्यद यांची तब्येत बिघडली होती. त्यांच्यामध्ये कोरोना लक्षणे दिसल्याने त्यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नीने त्यांना उपचारासाठी रुग्णालय नेलं. मात्र साधा ताप असल्याचं सांगत रुग्णालयाने त्यांना घेण्यास नकार दिला आणि परत पाठवण्यात आलं. त्यानंतर त्या इतर रुग्णालयात गेल्या. तिथेही त्यांना हेच सांगण्यात आलं. त्यामुळे त्या पतीला घेऊन घरी आल्या आणि तिथेच उपचार सुरू केले. पतीला कोरोना झाल्याची शंका डॉक्टर पत्नीला आली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या घरामध्येच आयसोलेशन सेंटर केलं होतं. तिथेच ते बरे झाले. 

31 मार्चला एका रुग्णालयात पतीची कोरोनाची तपासणी करण्यात आली. त्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत घरी पाठवलं होतं. तोपर्यंत डॉक्टर पत्नीने उपचार सुरू केले होते. सहा दिवसांनी तपासणीचे रिपोर्ट आले त्यात पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाली. रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्यांनी प्रशासनाला याबाबत माहिती दिली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. तोपर्यंत त्यांच्यात कोरोनाची लक्षणं उरली नव्हती. शेवटी 17 एप्रिलला करण्यात आलेला रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: आजपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल; थोडी सूट, काही निर्बंध

CoronaVirus: ग्रीन, ऑरेंज झोनमधील नागरिकांना आजपासून दिलासा; जाणून घ्या काय बंद, काय सुरू

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेशdoctorडॉक्टरIndiaभारतhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू