शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

Coronavirus: कोरोनाचं भयावह चित्र, पंधरवड्यात एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू, ५ जणांचं एकाच दिवशी तेरावं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 11:34 IST

Coronavirus in India: देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत. 

लखनौ - देशाला हादरवणारी कोरोनाची दुसरी लाट आता बऱ्यापैकी ओसरली असली तरी या लाटेने अनेक कुटुंबांना दिलेल्या वेदनांच्या हृदयद्रावक कहाण्या आता समोर येत आहेत.  (Coronavirus in India) अशीच एक दु:खद घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. येथील एका कुटुंबावर कुटुंबातील पाच सदस्यांचं तेरावं एकाच दिवशी घालण्याचा दु:खद प्रसंग ओढवला. कुठल्याही कुटुंबावर अशी वेळ क्वचितच आली असेल, त्यातही ज्या पाच जणांचं तेरावं करण्यात आलं त्यामध्ये चार जण सख्खे भाऊ होते. (Horrible picture of coronavirus, 8 members of the same family die in 20 days in Uttar Pradesh)

लखनौमधील ओमकार यादव यांच्या कुटुंबाला या दु:खद प्रसंगाला सामोरे जावे लागले. लखनौजवळ असलेल्या इमलिया पूर्वा गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या लाटेत यादव यांचे संपूर्ण कुटुंब उदध्वस्त झाले. हसत्या खेळत्या कुटुंबातील चार महिला विधवा झाला. कुटुंबातील एकूण आठ जणांच्या अवघ्या २० दिवसांच्या काळात मृत्यू झाला. त्यापैकी ७ जणांचा कोरोनाने तर एका ज्येष्ठ व्यक्तीचा भीतीने हृदयगती बंद पडून मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार २५ एप्रिलपासून १५ मेपर्यंतच्या काळात एकाच कुटुंबातील ८ जणांचा कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू झाला. याबाबत गावाचे सरपंच मेवाराम यांनी सांगितसे की, एवढी भयावह घटना घडल्यानंतरही सरकारकडून कुठल्याही सॅनिटायझेशनची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच कोरोनाची चाचणी करण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.   कोरोनाचा संसर्ग होऊन कुटुंबातील आठ सदस्यांना गमावल्यानंतर आता या कुटुंबाला मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे सरकारकडून अद्यापपर्यंत सॅनिटायझेशन आणि कुटुंबीयांच्या चाचण्यांची व्यवस्था झाली नसल्याचा आरोप केला जात आहे. गावच्या सरपंचांनी केलेल्या दाव्यानुसार येथे सुमारे ५० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रशासन अद्याप येथे पोहोचू शकलेले नाही.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यू