शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाग्रस्ताच्या उपचारात ऑक्सिजनचा तुटवडा भासू देऊ नका; केंद्राचे राज्यांना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 22:43 IST

कोरोनाग्रस्ताच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. 

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करू नका, असं निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्वच राज्यांना दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भाल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रात ऑक्सिजनच्या पुरवठ्याकडे विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. कोरोना व्हायरसच्या दृष्टीने ऑक्सिजनचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये करण्यात आला आहे, त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या उपचारात त्याची कमतरता भासू देऊ नका, असंही त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. कर्मचार्‍यांना घरोघरी ऑक्सिजन युनिट्स नेण्याची सुविधाभल्ला यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, लॉकडाऊनसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांद्वारे सर्व प्रकारच्या वैद्यकीय पुरवठा साहित्य व उपकरणे तयार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गॅस आणि लिक्विड ऑक्सिजन निर्माण करणारी सर्व उत्पादक युनिट, ऑक्सिजन सिलिंडर्सचे उत्पादन करणारे युनिट आणि त्यांची वाहतूक एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी करणाऱ्यांना कोणतीही बाधा येता कामा नये. तसेच ऑक्सिजन युनिट्सचा पुरवठा सुनिश्चित केला जावा. या पत्राद्वारे त्यांनी कर्मचाऱ्यांना ऑक्सिजन युनिट त्यांच्या घरातून कारखान्यात नेण्याची परवानगी दिली आहे. परंतु संबंधित कामात सामाजिक अंतर राखणे आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  सर्व रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत वेळेत माहिती देण्याच्या सूचनायापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करण्याच्या पद्धतींविषयी राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सर्व रुग्णालये आणि संबंधित कर्मचार्‍यांना ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून राज्यांनी गरजेनुसार पुरवठा करावा, असंही त्यांनी सुचवलं आहे. आज एकाच दिवसात देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत 708 नव्या रुग्णांची भर पडली असून, गेल्या 24 तासांत 28 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 4281 वर पोहोचली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 3 हजार 851 रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 318 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तर तामिळनाडू आणि दिल्लीमध्येही रुग्णांचा आकडा 500च्या वर पोहोचला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहाCentral Governmentकेंद्र सरकार