शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाकाळात सार्वजनिक बस, रेल्वेने प्रवास करताय? आरोग्य मंत्रालयाने दिला असा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:36 IST

Coronavirus in India: अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बस रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासाच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास ओसरली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ६० हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील अनेक भागात अनलॉकची प्रक्रियाही सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बस रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासाच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. (Health Ministrys, Joint Secretary,  Lav Agarwal Says Avoid travel as much as you can )

कोरोनाकाळात बस, रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा कमीत कमी वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाविरोधात लढण्यासाठीचे लसीकरण हे अतिरिक्त साधन आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, तसेच शक्य असेल तेवढा प्रवास करणे टाळा. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या सल्ल्यामुळे पुढचा अजून काही काळा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यावर निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग बऱ्यापैकी कमी झाला असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे  60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2726 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,95,70,881 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (15 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यPublic Transportसार्वजनिक वाहतूक