शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

coronavirus: 'आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना ४ महिन्यांचा पगार आत्ताच मिळणार, राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 17:02 IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत.

ओडिशा -  जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. तसेच, स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचंही यात योगदान आहे. आता, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यासाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ऑन ड्युटी २४ तास सेवा देत या क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे या सर्व लढवय्या कर्मचाऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या घराबाहेर येऊन, खिडकीत उभे राहुन आपली कृतज्ञता व्यक्त केली. सोशल मीडियावरही या सर्वांच्या कार्याला सलाम करण्यात येत आहे. विविध इमेजेस आणि टिकटॉक व्हिडीओ बनवून यांच्या कार्याच कौतुक होत आहे. आता, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पुढील ४ महिन्यांचा पगार अॅडव्हान्स स्वरुपात देण्यात मंजुरी दिली आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाशी संबंधित सर्वच कर्मचारी आणि कामगारांना पुढील ४ महिन्यांचा पगार आत्ताच मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल आणि धैर्य वाढवणारा हा निर्णय आहे. पटनाईक यांच्या या निर्णयाचे राज्यातील सर्वच आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे 

दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लॉक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉक डाऊन म्हणजेच एकप्रकारची संचारबंदी लागू केली आहे. देशातील सर्वच राज्यांना हा निर्णय बंधनकारक असणार आहे 

 

टॅग्स :Odishaओदिशाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यdoctorडॉक्टरChief Ministerमुख्यमंत्री