शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 09:29 IST

Coronavirus : 23 राज्यांमधील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही.

नवी दिल्ली - कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आजपर्यंत 450 हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत 1992 जणांनी कोरोनावर मात केल्याची माहिती मिळत आहे. 23 राज्यांमधील 45 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला नाही. 3 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांनी कोरोनाचा नवा रुग्ण आढळला असल्याची माहिती  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी शनिवारी दिली. त्यानंतर आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून एका दिवसात तब्बल 2 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद /आयसीएमआरने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार, भारतात एका दिवसात कोरोनाचे 2154 नवे रुग्ण आढळले असून कोरोनाग्रस्तांची संख्या 16 हजार 365 वर पोहोचली आहे. शनिवारपर्यंत 3,54,969 लोकांच्या 3,72,123 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 16, 365 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

भारतात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 3.3 टक्के आहे. सर्वाधिक 75 टक्के मृत्यू 61 पेक्षा जास्त वय असलेल्यांमध्येच आहे. 61 ते 75 वयोगटात 33.1 तर 75 पेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 42.2 टक्के आहे. 0 ते 45 टक्के वयोगटात 14.4, 45 ते 60 वयोगटात 10.3 टक्के मृत्यूचे प्रमाण आहे. पूर्वव्याधी असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण 83 टक्के आहे.

आरोग्य क्षेत्रातील अनेकांनी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन औषध घेतले. अनेकांना त्यामुळे साईड इफेक्ट्स दिसल्याने सरकारची चिंता वाढली असल्याचे आयसीएमआरचे संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले. एचसीक्यू औषध घेतलेल्या 10 टक्के डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पोटात दुखण्यासारखी लक्षणे दिसली. तर 6 टक्क्यांमध्ये उलटी होणे, हायपोग्लेसमिया प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी नमूद केले.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन

CoronaVirus: दिलासादायक! ४५ जिल्ह्यांमध्ये नवा रुग्ण नाही

CoronaVirus: ‘ऑक्सफर्ड’ सप्टेंबरअखेरपर्यंत आणणार कोरोनाची लस?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतDeathमृत्यू